… तर राज्यात राष्ट्रपती राजवटीची वेळ येईल : सुधीर मुनगंटीवार

शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे विधान केल्यानंतर भाजपकडून त्याला दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar on Presidential rule) यांनी उत्तर दिले आहे.

... तर राज्यात राष्ट्रपती राजवटीची वेळ येईल : सुधीर मुनगंटीवार


चंद्रपूर : शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे विधान केल्यानंतर भाजपकडून त्याला दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar on Presidential rule) यांनी उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री निवड वा खातेवाटप पत्रकार परिषदेत ठरत नसल्याचे मुनगंटीवारांनी (Sudhir Mungantiwar on Presidential rule) सांगितलं. राज्याचा जनादेश महायुतीलाच आहे, त्यामुळे आम्ही चर्चा करुन सरकार स्थापन करु. राज्य प्रगतीच्या मार्गावर नेऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. महायुतीला सरकार स्थापन करावेच लागेल असे त्यांनी ठामपणे सांगितले.

विशिष्ट मुदतीत सरकार स्थापन झाले नाही तर राष्ट्रपती राजवट लावण्याचा नियम आहेच. त्यात नवे काही नाही, असे सांगत छत्तीसगड राज्यात एकाच पक्षाला बहुमत होते तरीही सरकार स्थापनेला उशीर लागला, असे सांगत चर्चा आणि संवादाने यातून मार्ग निघेल असे मुनगंटीवार म्हणाले.

मुख्यमंत्री कोणाचा होईल यावर उत्तर देताना मुनगंटीवार यांनी आम्ही तीस वर्षात गोडव्यानेच  पुढे जात आहोत. उद्धव ठाकरेंनीही देवेंद्र शिवसैनिकच आहेत असे म्हटले. त्यामुळे मुख्यमंत्री महायुतीच होणार हे स्पष्ट झाल्याचे मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI