AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भाजपला जिंकव’, कलेक्टर-डे. कलेक्टर यांचं चॅट व्हायरल

भोपाळ : सोशल मीडियावर मध्य प्रदेशच्या दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये व्हॉट्सअॅपवर झालेला संवाद व्हायरल होतो आहे. हा संवाद मध्य प्रदेशात झालेल्या निवडणुकांदरम्यानचा असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये मध्य प्रदेशच्या महिला जिल्हाधिकारी दुसऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यांना भाजपला जिंकव, असं म्हणत आहे. व्हॉट्सअॅप चॅटमध्ये काय आहे? उपजिल्हाधिकारी- मॅम, दोन सेक्टरमध्ये परीस्थिती नियंत्रणात आहे, पण जैतपूरच्या परीस्थितीवर नियंत्रण मिळवणे कठीण जात […]

'भाजपला जिंकव', कलेक्टर-डे. कलेक्टर यांचं चॅट व्हायरल
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM
Share

भोपाळ : सोशल मीडियावर मध्य प्रदेशच्या दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये व्हॉट्सअॅपवर झालेला संवाद व्हायरल होतो आहे. हा संवाद मध्य प्रदेशात झालेल्या निवडणुकांदरम्यानचा असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये मध्य प्रदेशच्या महिला जिल्हाधिकारी दुसऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यांना भाजपला जिंकव, असं म्हणत आहे.

व्हॉट्सअॅप चॅटमध्ये काय आहे?

उपजिल्हाधिकारी- मॅम, दोन सेक्टरमध्ये परीस्थिती नियंत्रणात आहे, पण जैतपूरच्या परीस्थितीवर नियंत्रण मिळवणे कठीण जात आहे, काँग्रेस आघाडी घेत आहे आणि उमा धुर्वेचे समर्थक जास्त आहेत.

जिल्हाधिकारी- मला काँग्रेस क्लीन स्वीप हवंय, मी आरओ देहरीयाला फोन करते, पुजा तुला जिल्हाधिकारी व्हायचं असेल, तर जैतपूरमध्ये भाजपला जिंकवावं लागेल.

उपजिल्हाधिकारी- ओके मॅम, मी मॅनेज करते, पण कुठली चौकशी तर नाही होणार ना?

जिल्हाधिकारी- मी आहे ना, तू मेहनत करत आहेस, तर भाजप सरकार बनताच तुला जिल्हाधिकारी बनवू.

व्हायरल होत असलेला हा संवाद शहडोलच्या जिल्हाधिकारी अनुभा श्रीवास्तव आणि उपजिल्हाधिकारी पुजा तिवारी यांमध्ये झाला असल्याची माहिती आहे. त्यांच्य़ा या संवादाचा स्क्रीनशॉट सध्या व्हायरल होतो आहे. मात्र, हा स्क्रीनशॉट फेक असल्याचा दावा उपजिल्हाधिकारी पुजा तिवारी यांनी केला आहे. त्यांनी यासंबंधी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कोतवाली पोलिसांनी सध्या आयटी अॅक्ट अंर्तगत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरु आहे.

मध्य प्रदेशच्या शहलोड जिल्ह्यात ब्यौहारी, जयसिंगनगर आणि जैतपूर या तीन विधानसभेच्या जागा आहे.  2018 च्या विधानसभा निवडणुकीत जैतपूरहून भाजपच्या मनिषा सिंह यांनी काँग्रेसच्या उमा धुर्वेला पराभूत केले होते. या जागेवर मनिषा सिंह यांना 74 हजार 279 मतं मिळाली होती, तर उमा धुर्वे यांना 70 हजार 63 मतं पडली.

मध्य प्रदेशात 28 नोव्हेंबर 2018 रोजी निवडणुका झाल्या, तर 11 डिसेंबरला मतमोजणी झाली. या निवडणुकीत काँग्रेस बहूमताने विजयी झाला. त्यानंतर काँग्रेसचे कमलनाथ हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री तर सचिन पायलट हे उप-मुख्यमंत्री बनले.

संबंधीत बातम्या :

राज ठाकरेंचा मुद्दा कमलनाथांनी अंमलात आणला, मध्य प्रदेशात भैय्यांना ‘नो एंट्री’

वय वर्ष फक्त 32, मध्य प्रदेशात दिग्विजय सिंहांच्या मुलाला कॅबिनेट मंत्रीपद

शेतकऱ्यांची थट्टा, मध्य प्रदेशात शेतकऱ्यांचं फक्त 25 रुपये कर्ज माफ

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.