AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकास तीन हे रडव्यांचे लक्षण; करुन दाखवा, रडून नको, आशिष शेलारांचे सलग 8 ट्वीट

करुन दाखवा, रडून नको!" अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकासआघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर (Ashish Shelar Tweet Criticizes Mahavikas Aghadi) केली. 

एकास तीन हे रडव्यांचे लक्षण; करुन दाखवा, रडून नको, आशिष शेलारांचे सलग 8 ट्वीट
| Updated on: May 27, 2020 | 8:05 PM
Share

मुंबई : “विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्राला काय मिळेल आणि कसे मिळेल हे सांगितले. त्यावर ऐवढी का कळ पोटात गेली. एका माणसाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला “आघाडीची तीन माणसं” धावली. घाबरताय कशाला? तुमचं अपयश, नाकर्तेपणा उघड होतो त्याला? एकास तीन हे तर भित्रे, रडव्यांचे लक्षण! करुन दाखवा, रडून नको!” अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकासआघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर (Ashish Shelar Tweet Criticizes Mahavikas Aghadi) केली.

“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची आकडेवारी आभासी असून, गोंधळ निर्माण करुन महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे,” असा आरोप यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विटरवर लागोपाठ आठ ट्विट करत महाविकासआघाडीच्या नेत्यांवर टीका केली.

आशिष शेलार नेमकं काय म्हणाले?

“विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्राला काय मिळेल आणि कसे मिळेल हे सांगितले त्यावर ऐवढी का कळ पोटात गेली.एका माणसाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला “आघाडीची तीन माणसं” धावली.घाबरताय कशाला?तुमचं अपयश,नाकर्तेपणा उघड होतो त्याला? एकास तीन हे तर भित्रे,रडव्यांचे लक्षण! करुन दाखवा,रडून नको!

“महाराष्ट्रात सर्व आलबेल असल्याचे,आभासी चित्र निर्माण करणाऱ्या आघाडीच्या”तीन माणसांच्या” दाव्यांचा पर्दाफाश पत्रकारांनी त्याच जागी केला. पत्रकरांच्या पहिल्या प्रश्नातच मुंबईतील अपयश उघडे झाले आणि “तीन माणसं” एकमेकाकडे बघत बसले! आभासी फुगा जागीच फोडणाऱ्या पत्रकारांचे आभार!!”

“आघाडीची “तीन माणसं” बोलली कि रडली..? कोरोना आल्यापासून हे असेच रोज रडणे सुरु आहे. कधी केंद्राच्या नावाने रडायचे.. अधी विरोधी पक्षाच्या नावानं.. आता थाबवा ही तुमची रडगाणी.. आता करुन दाखवा ना! तुम्ही मदत द्या.. शेतकऱ्यांना पँकेज द्या.. कोरोनापासुन महाराष्ट्राला वाचवा! रडू नका!!”

“तथाकथित अर्थतज्ज्ञ जयंत पाटील हे पण आज विपर्यास करुन-करुन रडले…पण किती रडणार? खोटं किती बोलणार?अर्थतज्ज्ञ म्हणवता मग महाराष्ट्रात अर्थक्रांती घडंवा ना..कुणी रोखलंय तुम्हाला..उगाच पावटे खाल्या सारखे का वागताय?दुर्गंधी का सोडताय? “त्यांना”जमत नसेल “तुम्ही” करुन दाखवा!”

“महाराष्ट्र द्रोही तर तुम्ही आहात..तुमची निष्क्रियता महाराष्ट्राचे नुकसान करतेय..महाराष्ट्राला मागे घेऊन जातेय. तुमच्या निष्क्रियतेने गिप्ट सीटी महाराष्ट्राने गमावली..सांगली ऐवजी अफ्रिकेत ऊस पिकवणे हा महाराष्ट्र द्रोह नव्हे काय? आता उद्योग महाराष्ट्रात येऊ नयेच असे का वागताय?”

“गेली 20 वर्षे सत्ता असणाऱ्या, सुमारे 33 हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मृतदेहाच्या बाजूला रुग्णांना उपचार देत आहात.. अनिल परब हा आभास नाही सत्य! आभासी रडू नका, या सत्यावर बोला! मुंबईकर तुम्हाला विचारतोय काय करुन दाखवलंत? त्याचं उत्तर द्या!”

“आघाडीची तीन माणसं” बोलली.. पण मुख्यमंत्री कुठे आहेत? उपमुख्यमंत्री कुठे आहेत? मुंबईचे पालकमंत्री कुठे आहेत? मदतीचे पँकेज कुठे आहे? निष्पाप माणसं मरत आहेत.. खाटा नाहीत, डाँक्टर नाहीत, रुग्णवाहिका नाहीत.. त्याचे काय ते सांगा.. सामान्य माणसाचे हालहाल करताय त्यावर बोला!

“आघाडीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस असून नसल्यासारखे वाटले. बहुतेक पक्षाचे प्रमुख राहुल गांधी यांची सुचना तंतोतंत पाळली. पळकुटी भूमिका आज पण दिसली! काँग्रेस पळुन दाखवतेय… किमान बाकीच्यांनी रडून नको करून दाखवा!”, असे एकापाठोपाठ आठ ट्विट आशिष शेलार यांनी केले.

हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांच्या प्रत्येक दाव्याला अनिल परब यांचं प्रत्युत्तर

शिवसेना नेते अनिल परब यांनी फडणवीसांनी सादर केलेल्या प्रत्येक आकडेवारीवर स्पष्टीकरण दिलं. त्याशिवाय जयंत पाटील यांनी आर्थिक तरतुदीचे बारकावे नमूद केले. याशिवाय बाळासाहेब थोरात यांनी आमचं सरकार योग्य उपाययोजना करत असल्याचं नमूद केलं.

महाराष्ट्र सरकारच्या हक्काचे १९-२० वर्षाचे १८ हजार २७९ कोटी हे अजून मिळायचे आहेत. हे अजून मिळालेले नाही. यावर्षाचे म्हणजे एप्रिल मे चे केवळ 2359 कोटी रुपये मिळाले आहेत. हे दोन महिन्याचे आहेत. त्यामुळे १८,२७९ कोटी हक्काचे पैसे महाराष्ट्राला अजून मिळालेले नाही. ते मिळाले तरी पुष्कळ आहेत. त्याची आम्ही मागणी करतो ते मिळालेले नाही, अशी मागणी अनिल परब यांनी यावेळी (Ashish Shelar Tweet Criticizes Mahavikas Aghadi) केली.

संबंधित बातम्या : 

फडणवीसांची आकडेवारी आभासी, महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न : महाविकास आघाडी

महाराष्ट्रातील तरुणांना कमी लेखणाऱ्या फडणवीसांचा मोदींच्या स्किल इंडियावर विश्वास नाही : जयंत पाटील

चिडलेल्या रेल्वेमंत्र्यांनी एकदम 152 ट्रेन उलट-सुटल सोडल्या, सरकारच्या बदनामीचा प्रयत्न : अनिल परब

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.