महाराष्ट्रातील तरुणांना कमी लेखणाऱ्या फडणवीसांचा मोदींच्या स्किल इंडियावर विश्वास नाही : जयंत पाटील

कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे (Jayant Patil criticizes Devendra Fadnavis).

महाराष्ट्रातील तरुणांना कमी लेखणाऱ्या फडणवीसांचा मोदींच्या स्किल इंडियावर विश्वास नाही : जयंत पाटील
Follow us
| Updated on: May 27, 2020 | 7:44 PM

मुंबई : कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे (Jayant Patil criticizes Devendra Fadnavis). देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील तरुणांकडं परप्रांतिय मजुरांप्रमाणे कौशल्यं नाही म्हणतात. मात्र, यातून महाराष्ट्रातील तरुणांना कमी लेखणाऱ्या फडणवीसांचा पंतप्रधान मोदींच्या स्किल इंडियावरच विश्वास नसल्याचं दिसत आहे, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. महाविकासआघाडीच्या या पत्रकार परिषदेत शिवसेनेकडून परिवहन मंत्री अनिल परब आणि काँग्रेसकडून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हेही उपस्थित होते (Jayant Patil criticizes Devendra Fadnavis)

जयंत पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यात ते महाराष्ट्राच्या प्रश्नांविषयी चिंता व्यक्त करताना कोरोनाशी लढा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील अशी मला अपेक्षा होती. मात्र, दुर्दैवाने त्यांची भूमिका यापेक्षा वेगळी दिसली. फडणवीस यांनी महाराष्ट्रातील या सर्व कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांवर पाणी ओतण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस यांनी परराज्यातील मजूर बाहेर गेल्याने आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल असं सांगितलं. तसेच महाराष्ट्रातील लोकांकडे त्या मजुरांसारखी कौशल्य नाही असं म्हटलं. यातून त्यांनी महाराष्ट्रातील तरुणांना कमी लेखलं आहे.”

“महाराष्ट्रातील तरुणांमध्येही कौशल्यं आहेत. ते ही संपूर्ण कारखानदारी चालू करु शकतात. जे मजूर गेले आहेत ते पुन्हा येतीलच, मात्र, आज त्यांच्या अनुपस्थितीत ही महाराष्ट्रातील कारखानदारी चालू व्हावी म्हणून महाराष्ट्रातील कुशल तरुण पुढे येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्किल इंडियाची योजना आणली होती. ती योजना अपयशी झाली की काय अशाप्रकारचं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मागील 5 वर्षात स्किल इंडियाने जी कौशल्ये दिली असतील त्याचा वापर व्हायला हवा. पण त्यावर फडणवीस यांचा विश्वास दिसत नाही,” असंही जयंत पाटील यांनी नमूद केलं.

“मुंबई कोरोनाशी लढत असताना आयएफएससी मुख्यालय गुजरातमध्ये”

यावेळी जयंत पाटील यांनी आयएफएससीचं मुख्यालय गुजरातमध्ये नेण्याच्या निर्णयावरही सडकून टीका केली. एकिकडे मुंबईसह महाराष्ट्र कोरोनाशी लढत आहे आणि दुसरीकडे केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारने आयएफएससीचं मुख्यालय गुजरातमधील गिफ्ट सिटीत नेण्याचा निर्णय 27 एप्रिल म्हणजेच काल-परवा घेतला. मुंबई अडचणीत असताना मुंबईच्या समांतर गुजरातमध्ये व्यवस्था उभारण्याचं काम गुजरातमध्ये झालं. त्याचं देवेंद्र फडणवीस समर्थन करत आहेत. याचं आम्हाला दुःख आहे, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.

जयंत पाटील म्हणाले, “महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबईची परिस्थिती हाताबाहेर गेल्याच्या बातम्या जाणीवपूर्वक विविध माध्यमांतून सोडण्यात आल्या आहेत. मात्र, देशातील सर्वात उत्तम काम मुंबईत झालं आहे हे मी अत्यंत नम्रपणाने सांगतो. 2 एप्रिलच्या दरम्यान केंद्र सरकारचं पथक आणि जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ सांगत होते, की एप्रिलच्या अखेरपर्यंत मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दीड लाख होईल. मात्र, त्यावेळी रुग्णांचा आकडा केवळ 10,498 इतका झाला. हे मुंबईसह महाराष्ट्रात राबवलेल्या योजनाबद्ध कामाचं श्रेय आहे. आमच्या सरकारने वेळीच केलेल्या उपाययोजनांमुळेच हे झालं हे लक्षात घेतलं पाहिजे. जागतिक दर्जाच्या 10 तज्ज्ञांची एक विशेष टास्क फोर्स करण्यात आली आहे. ते 24 तास राज्यातील रेफर केलेल्या रुग्णांना योग्य ती मदत करत आहेत.”

“आम्ही महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या दुप्पट होण्याच्या दरावर सर्वात जास्त नियंत्रण आणलं”

आपण सातत्याने महाराष्ट्रात 52 हजार कोरोना रुग्णांच्या संख्येचा वारंवार उल्लेख करतो आहोत. मात्र, महाराष्ट्रात मुंबईसह केवळ 35 हजार 178 रुग्णंच कोरोना सक्रीय आहेत. त्यामुळे नागरिकांना घाबरण्याचं कारण नाही. हा रोग अवघड आहे हे मान्य आहे. मात्र, आपली कोरोना रुग्णांची संख्या हाताबाहेर आहे असं नाही. आम्ही महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या दुप्पट होण्याच्या दरावर सर्वात जास्त नियंत्रण आणलं आहे. सुरुवातीला हा दर 3.8 होता, तो आता 14.2 दिवस इतका झाला आहे. आज 10 रुग्ण असेल तर त्यांची संख्या 20 होण्यासाठी 14 दिवसांहून अधिक वेळ लागेल. सुरुवातीला एप्रिलच्या मध्यवर कोरोनाचा मृत्यूदर 7.6 इतका होता, तो आता 3.25 इतका आहे. आपला हा दर गुजरातपेक्षाही चांगला आहे, असंही जयंत पाटील यांनी नमूद केलं.

जयंत पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:

  • कुठल्याही राज्याच्या तुलनेत मुंबई आणि महाराष्ट्रात कोविडच्या बाबतीत अधिक सुविधा, मुंबईत लोकसंख्येची घनता अधिक असतानाही रुग्णसंख्या आटोक्यात : जयंत पाटील
  • आम्ही कर्ज काढू, पण कर्ज द्यायचं तर खुल्या दिल्याने द्या, अटीशर्थी घालू नका : जयंत पाटील
  • ४९ लाख मास्क मागितले, पण १३ लाख १३ हजार ३०० च आले, पीपीई किट्स आणि व्हेंटीलेटर 21 मेच्या आकड्यानुसार शून्य मिळाले : जयंत पाटील
  • पंतप्रधान निधीला पैसे द्या, पण मुख्यमंत्री निधीला देऊ नका, असं आवाहन फडणवीस यांनी केलं, भाजप महाराष्ट्राचा शत्रू आहे की मित्र, हा प्रश्न पडतो : जयंत पाटील
  • IFSC गुजरातला नेण्याचे समर्थन देवेंद्र फडणवीस यांनी केलं हे दुर्दैवी : जयंत पाटील
  • महाराष्ट्रातील युवकांकडे आवश्यक ती सर्व कौशल्य, फडणवीस यांनी त्यांना कमी लेखू नये, जे मजूर गेले ते परत येतील, पण मोदींनी राबवलेला ‘स्कील इंडिया’ महाराष्ट्रात फेल गेला का, असं वाटतं : जयंत पाटील
  • आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पाठीशी उभं असल्याचं फडणवीस सांगतील, असं वाटलं, मात्र त्यांनी महाराष्ट्र बचाव आंदोलन करुन आमच्या आणि यंत्रणेच्या प्रयत्नांवर पाणी ओतण्याचा प्रयत्न केला : जयंत पाटील
  • रुग्ण दुपटीचा वेग मंदावला, महाराष्ट्रात मृत्यूदर ३.२५ टक्क्यावर, ही स्पर्धा नाही, पण गुजरातपेक्षा महाराष्ट्रात दर नियंत्रणात. मुंबईत १० हजार अतिरिक्त बेड्स : जयंत पाटील
  • मे महिनाअखेर राज्यात दीड लाख कोरोना केस होतील असा केंद्र आणि WHO चा अंदाज होता, मात्र फार तर 60 हजार पर्यंत जातील असा आमच्या टास्क फोर्सचा अंदाज, मुंबई-पुण्यासह राज्यात डेथ ऑडीट करणारी टीम, सध्याच्या घडीला फक्त ३५ हजार १७८ पॉझिटिव्ह : जयंत पाटील
  • महाराष्ट्र आणि मुंबईची परिस्थिती हाताबाहेर गेल्याच्या बातम्या सोडल्या जात आहेत, मात्र देशात सर्वात चांगले काम मुंबईत झाले आहे : जयंत पाटील

संबंधित बातम्या :

फडणवीसांची आकडेवारी आभासी, महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न : महाविकास आघाडी

चिडलेल्या रेल्वेमंत्र्यांनी एकदम 152 ट्रेन उलट-सुटल सोडल्या, सरकारच्या बदनामीचा प्रयत्न : अनिल परब

देवेंद्र फडणवीसांच्या प्रत्येक दाव्याला अनिल परब यांचं प्रत्युत्तर

संबंधित व्हिडीओ:

Jayant Patil criticizes Devendra Fadnavis

Non Stop LIVE Update
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका.