AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस भेटीसाठी शरद पवारांच्या घरी, सिल्व्हर ओकवर भेट

विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली.

देवेंद्र फडणवीस भेटीसाठी शरद पवारांच्या घरी, सिल्व्हर ओकवर भेट
Devendra Fadnvis Meets sharad Pawar
| Updated on: May 31, 2021 | 1:44 PM
Share

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक इथे जाऊन फडणवीस शरद पवारांना भेटले. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. (BJPs Devendra Fadnavis meets NCP leader Sharad Pawar)

माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री शरद पवारजी यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट

एकीकडे महाविकास आघाडीचे सर्व नेते मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनात असताना दुसरीकडे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, मुंबईत आज MMRDA महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वेगवेगळ्या विकास कामांचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रोच्या 2 ए आणि 7 या मार्गिकेच्या चाचण्यांचा शुभारंभ केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचं नाव होतं, मात्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नावच नव्हतं. त्यामुळे भाजनपे या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया

दरम्यान, या भेटीबाबत आणि भाजपच्या बहिष्काराबाबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीव्ही 9 कडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी या प्रकल्पासाठी दिवसरात्र परिश्रम घेतले. रात्रीच्या 2 ते 3 दरम्यानदेखील देवेंद्र फडणवीसांनी कामाच्या ठिकाणी भेटी दिल्या. तुम्ही श्रेय घ्या, मात्र ज्यांनी पाया रचला किंबहुना प्रकल्प पूर्णत्वास नेला त्यांना कार्यक्रमांना बोलवणं गरजेंचं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधी झालं नाही, मात्र गेल्या काही दिवसापासून असा पाया महाविकास आघाडीने रोवलाय, म्हणून विरोधी पक्षाकडून दोन्ही कार्यक्रमांवर बहिष्कार घातला”

देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीपूर्वी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षणावरुन महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. या पत्रकार परिषदेनंतर लगेचच देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांची भेट घेतली. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध कामांचं उद्घाटन

मेट्रोच्या 2 ए आणि 7 या मार्गिकेच्या चाचण्यांचा शुभारंभ

शिवाय टी 1 आणि टी 2 ला जोडण्यासाठी अंडरपास आणि एलिव्हेटेड रस्ते करण्यासाठी भूमीपूजनही केलं.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी कल्याण रो वरील रजनोली उड्डाणपुलाचं आणि दुर्गडी उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे ऑनलाईन उदघाटन

या ठाणे जिल्ह्यातील प्रोजेक्टमुळे नव्या रोड कंनेक्टिविटी रजनोली आणि दुर्गडी उड्डाणपुलामुळे प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे.

संबंधित बातम्या 

OBC आरक्षणाचा मुडदा पडत होता, मंत्री मोर्चे काढत होते, फडणवीसांचा हल्ला; आरक्षण वाचवण्यासाठी मार्ग सांगितला

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.