एकनाथ खडसे ‘घड्याळाची वेळ’ साधण्याची चिन्हं, 10-10 च्या मुहूर्तावर राष्ट्रवादीत प्रवेश?

पवारांना भेटण्यासाठी खडसे कालच मुंबईत दाखल झाल्याने ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे.

एकनाथ खडसे 'घड्याळाची वेळ' साधण्याची चिन्हं, 10-10 च्या मुहूर्तावर राष्ट्रवादीत प्रवेश?

मुंबई: गेल्या काही वर्षांपासून भाजपवर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे. पवारांना भेटण्यासाठी खडसे कालच मुंबईत दाखल झाल्याने ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. (BJP leader Eknath Khadse will meet NCP president Sharad Pawar today)

गेल्या काही दिवसांपासून एकांतवासात असलेले एकनाथ खडसे कालच मुंबईत आले आहेत. ते आज शरद पवारांना भेटणार असून राष्ट्रवादीत जाण्याबाबतचा निर्णय दोन दिवसांत घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला असून खडसे-पवार भेटीवर राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी नुकतीच राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. त्यात महाराष्ट्रातून पंकजा मुंडे, विनोद तावडे आदी नेत्यांचा समावेश करण्यात आला. मात्र, या कार्यकारिणीत खडसेंना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे खडसे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याचा कयासही वर्तवण्यात येत होता.

अशात गेल्या आठवड्यात शरद पवार आणि पक्षातील जळगावमधील नेत्यांसोबत एक बैठक केली होती. या बैठकीत खडसेंच्या प्रवेशावर चर्चा झाल्याचं बोललं जात होत. त्यानंतर आता खडसे मुंबईत आल्याने त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला आहे.

खडसे राष्ट्रवादीत आल्यास स्वागतच, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची भूमिका दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा विस्तार करण्यासाठी खडसेंसारख्या मातब्बर नेत्याचा फायदा होऊ शकतो, अशी अपेक्षा जळगाव जिल्ह्यातील नेत्यांना आहे. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत आले, तर त्यांचे स्वागतच आहे. मात्र, खडसेंचा निर्णय आता पक्षश्रेष्ठीच घेतील, असेही राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील म्हणाले होते.

इतर बातम्या –

मोठी बातमी! नवी मुंबईतल्या मराठा आरक्षणाच्या बैठकीला उदयनराजे येणार नाहीत
देश पुन्हा हादरला, 9 नराधमांकडून 3 शहरांत तरुणीवर सामूहिक बलात्कार

(BJP leader Eknath Khadse will meet NCP president Sharad Pawar today)

Published On - 10:51 am, Wed, 7 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI