AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Politics : नितीशकुमारांनी नैतिकता फ्रीजमध्ये ठेवली, ते बिहारच्या जनतेला मूर्ख समजतात; गिरीराज सिंह यांचा निशाणा

बिहारमध्ये (Bihar) नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी भाजपाला (BJP) जोरदार धक्का दिला आहे. नितीशकुमार यांच्या राजकीय खेळीमुळे बिहारमध्ये भाजपाला सत्ता गमवावी लागली आहे. तर नितीशकुमार यांच्या या खेळीचा सर्वाधिक फायदा हा राजदला झाला आहे. 

Bihar Politics : नितीशकुमारांनी नैतिकता फ्रीजमध्ये ठेवली, ते बिहारच्या जनतेला मूर्ख समजतात; गिरीराज सिंह यांचा निशाणा
| Updated on: Aug 10, 2022 | 12:20 PM
Share

नवी दिल्ली : बिहारमध्ये (Bihar) नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी भाजपाला (BJP) जोरदार धक्का दिला आहे. नितीशकुमार यांच्या राजकीय खेळीमुळे बिहारमध्ये भाजपाला सत्ता गमवावी लागली आहे. तर नितीशकुमार यांच्या या खेळीचा सर्वाधिक फायदा हा राजदला झाला आहे.  त्यानंतर आता भाजपाच्या नेत्यांकडून नितीशकुमार यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते गिरीराज सिंह यांनी नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नितीशकुमार यांना रात्री पंतप्रधानपदाचं स्वप्न पडतं.  नैतिकतेला फ्रीजमध्ये ठेवून नितीशकुमार पंतप्रधान बनायला चालले आहेत. नितीशकुमार यांना आम्ही पंतप्रधान बनवू शकत नाही. नितीशकुमार बिहारच्या जनतेला मूर्ख समजत आहेत, मात्र जनता सजग आहे. भाजपने नितीकुमार यांना मुख्यमंत्री बनवलं हिम्मत असेल तर त्यांनी पुन्हा निवडणुकांना सामोरे जावं असं आव्हान गिरीजार सिंह यांनी केलं आहे.

आज नितीशकुमार घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

दरम्यान मिळत असलेल्या माहितीप्रमाणे आज दुपारी दोन वाजता नितीशकुमार हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार नितीशकुमार यांचे नवे मंत्रिमंडळ हे  35 मंत्र्यांचं असणार आहे. त्यामध्ये आरजेडी 16, जेडीयू  13 आणि काँग्रेसच्या वाट्याला 4  मंत्रिपदे येण्याची शक्यता आहे. नितीशकुमार यांनी भाजपाला मोठा झटका दिला आहे. नितीशकुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन एनडीएमधून बाहेर पडले. आता ते आरजेडी  आणि काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार आहेत. आज नितीशकुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र भाजप नेते त्यांच्यावर टीकेची झोड उठवताना दिसत आहेत.

नितीशकुमारांविरोधात भाजप आक्रमक

दुसरीकडे भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपा कार्यकर्त्यांकडून नितीशकुमार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. नितीशकुमार यांच्या कार्यालयाबाहेर भाजपाच्या वतीने आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनात भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते सहभागी झाले आहेत.  या सर्व पार्श्वभूमीवर आता नितीशकुमार यांच्या कार्यालयाच्या संरक्षणात वाढ करण्यात आली आहे. नितीशकुमार यांनी अचानक मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने भाजपाच्या गोटात खळबळ उडाली असून, हा भाजपासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार