सचिन वाझे प्रकरणात नारायण राणेंकडून आता थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

सचिन वाझे, परमवीर सिंह ही छोटी माणसं आहेत, त्यांच्या मागचे हात शोधा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. आता भाजप नेते नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच राजीनाम्याची मागणी केली आहे.

सचिन वाझे प्रकरणात नारायण राणेंकडून आता थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
नारायण राणे, भाजप नेते
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 9:44 PM

मुंबई : सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून एकप्रकारे हा डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, सचिन वाझे, परमवीर सिंह ही छोटी माणसं आहेत, त्यांच्या मागचे हात शोधा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. आता भाजप नेते नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच राजीनाम्याची मागणी केली आहे. (Narayan Rane demands resignation of CM Uddhav Thackeray in Sachin Waze case)

“सचिन वाझे यांना निलंबित असताना खात्यात घेणे, क्राईममध्ये पोस्टिंग देणे, त्यांना प्रत्येक वेळी संरक्षण देणे, वाझे यांच्यावर कारवाई करण्यात विलंब लावणे, विरोधी पक्षाचतच्या दबावामुळे वाझे यांच्यावर कारवाई करणे, त्यातच मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची बदली होणे. माझ्या मते सचिन वाझे यांचा पूर्वेतिहास पाहता पोलीस खात्यात परत घेणे, मनसुख हिरेन आणि अन्य हत्या. या सर्वांना जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा”, अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस यांनी वाझेप्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे करताना सरकारला धारेवर धरलं. एटीएसकडे हिरेन प्रकरणाचा तपास गेल्यानंतर एटीएसने वाझेंना अटक करायला हवी होती. वाझेंना अटक करून एटीएसने त्यांना एनआएकडे द्यायला हवं होतं. पण एटीएसने तसं केलं नाही. हिरेन आणि अँटालिया प्रकरण हे एकमेकांशी कनेक्टेड आहे. त्यामुळे हिरेन प्रकरणाचा एनआयएने तपास करावा, असं सांगतानाच एटीएसवर आमचा अविश्वास नाही असं नाही. एटीएसवर विश्वास आहे. पण ज्या पद्धतीने कारवाई व्हायला हवी होती, तशी या प्रकरणात कारवाई झाली नाही. त्यामुळे हे प्रकरण एनआयएकडे देण्यात यावं, असं त्यांनी सांगितलं.

एटीएसवर दबाव आहे का?

एटीएसकडून सुरुवातीला अॅक्शन दिसली, पण आता काहीच दिसत नाही. एटीएसने जी कारवाई करायला हवी, ती होताना दिसत नाही. माझ्यासारख्या व्यक्तीला इतके पुरावे मिळत असतील, तर माझा दावा आहे पोलिसांकडे यापेक्षा जास्त पुरावे असतील. एटीएस ही चांगली यंत्रणा आहे. ते चांगलं काम करतात. पण त्यांच्यावर दबाव आहे का? असं वाटतंय. कारण या प्रकरणात पुरावे असूनही एटीएस पाहिजे तशी कारवाई करत नाही, त्यामुळे एनआयएने या प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली.

वाझे आणि परमबीर सिंग यांचे बॉस कोण?

एटीएस आणि एनआयएकडे टेप आहेत. त्यामध्ये वाझेने त्यांना काय काय म्हटलंय ते स्पष्ट आहे. या टेपमध्ये हिरेन आणि वाझे यांचं संभाषण आहे. त्याचा तपास केल्यास सर्व प्रकरणाचा उलगडा होईल, असा दावाही त्यांनी केला. एकटे सचिन वाझे इतकं मोठं कुंभाड रचू शकत नाहीत. त्यांच्यामागे कोण कोण आहेत हे बाहेर आलं पाहिजे. हे पोलीसांचं अपयश नाही तर सरकारचं अपयश आहे. वाझे आणि परमबीर सिंग यांना कोण ऑपरेट करत होतं. त्यांचे बॉस कोण आहेत, हे शोधून काढलं पाहिजे. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

संबंधित बातम्या :

पोलीस दलातलं पॉवरफुल पोस्टिंग ते थेट साईडलाईन, मुंबई कमिश्नर झालेल्या IPS अधिकाऱ्यांची अशी परंपरा?

मुंबईच्या पॉवरफुल पदावरुन परमबीर सिंग यांची उचलबांगडी का झाली?; हे आहेत 5 मोठी कारणं!

सचिन वाझे, परमबीर सिंग छोटी माणसं, त्यांच्या मागचे हात शोधा, देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत मागणी

Narayan Rane demands resignation of CM Uddhav Thackeray in Sachin Waze case

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.