Marathi News Politics BJP Leader Pankaja Munde on Opposition MLA and Her College Life love life and Opposition Leaders Namita Mundada Suresh Dhas Beed Politics
Bus Bai Bus : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात मुलाखत पार पडली. तेव्हा त्यांना अभिनय करण्याची विनंती करण्यात आली. आमदारांना फोडण्याविषयी, आपल्या कॉलेज जीवनाविषयी आणि लव्ह लाईफविषयी पंकजा मुंडेंनी दिलखुलास उत्तरं दिली.
मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची झी मराठीवरील बस बाई बस (Bus Bai Bus) या कार्यक्रमात मुलाखत पार पडली. तेव्हा त्यांना अभिनय करण्याची विनंती करण्यात आली. “एक चुटकी सिंदुर की किमत तुम क्या जानो रमेशबाबू” हा डायलॉग बदलून “एक-एक आमदार की किमत तुम क्या जानो सुबोधबाबू”, असा करण्यात आला. बस बाई बस कार्यक्रमाचा निवेदक सुबोध भावेकडे बघून त्यांना हा डायलॉग म्हणायचा होता. पंकजा मुंडेंना(Pankaja Munde )हा डायलॉग सादर करण्याची विनंती करण्यात आली. तेव्हा त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये डायलॉग सादर केला. त्यांच्या या अभिनय कौशल्याची चर्चा होतेय. शिवाय त्यांनी आमदारांना फोडण्याविषयी, आपल्या कॉलेज जीवनाविषयी आणि लव्ह लाईफविषयी दिलखुलास उत्तरं दिली.
होय मी विरोधीपक्षातील नेत्यांना फोडलंय. माझे बाबा गोपीनाथ मुंडेसाहेब यांनी मला सांगितलंय की कायम बेरजेचं राजकारण करायचं वजाबाकीचं नाही. त्यामुळे इतर पक्षात चांगलं काम करणाऱ्या लोकांना मी फोडलंय. बीड जिल्ह्यात झालेलं पक्षांतर त्याचंच द्योतक आहे. नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादीत येणं हे त्याचंच उदाहरण आहे. शिवाय सुरेश धसही भाजपत आले. त्यामुळे पक्षाच्या वाढीसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मी इतर पक्षातील चांगल्या नेत्यांना पक्षात आमंत्रित करते, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पक्षफोडीची कबुली दिली आहे. बस बाई बस या कार्यक्रमाचा निवेदक सुबोध भावे याने तुम्ही कधी इतर पक्षातील नेत्यांना फोडलं आहे का?, असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी उत्तर दिलंय.
” मी कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हा गोपीनाथ मुंडेसाहेब गृहमंत्री होते. मला भरपूर सिक्युरिटी असायची. त्यामुळे शक्यतो माझ्याशी बोलायली लोक घाबरायचे. पण एकदा मैत्री झाली की झाली! मग ती कायम टिकली, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तुम्हाला कुणी प्रपोज केलंय का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा नाही मला कुणी प्रपोज नाही केलं. तो सुखद अनुभव मला मिळाला नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे जयहिंद कॉलेजला शिकल्या. तिथे त्यांना कधी कुणी प्रपोज केलंय का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं.