बाळासाहेबांची शिवसेना विकली त्या संजय राऊतांनी हिंदुत्व शिकवू नये – भाजप

भाजपचे नेते प्रसाद लाड यांनीही बाळासाहेबांना वंदन केलं. त्यावेळी लाड यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

बाळासाहेबांची शिवसेना विकली त्या संजय राऊतांनी हिंदुत्व शिकवू नये - भाजप
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 3:34 PM

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. भाजपचे नेते प्रसाद लाड यांनीही बाळासाहेबांना वंदन केलं. त्यावेळी लाड यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. हिंदुत्व हे बाळासाहेबांचंच पण शिवसेना हे हिंदुत्व आता विसरली आहे. संजय राऊत यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीकडे जाऊन स्वत:ची तत्व विकली आहे. बाळासाहेबांची शिवसेना विकली त्या संजय राऊतांनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये, असा घणाघात प्रसाद लाड यांनी केलाय.(BJP leader Prasad Lad criticizes Shiv Sena MP Sanjay Raut)

जनसंघाच्या सर्वच नेत्यांचं स्थान आमच्या हृदयात आहे. आम्ही कुणाला विसरलो नाही. अटलजी, अडवाणीजी आमचे आदर्श आहेत आणि राहतील असंही प्रसाद लाड म्हणाले. दरम्यान, लाड यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. त्या भेटीबाबत बोलताना लाड यांनी सांगितले की, राज यांच्याशी घरचे संबंध आहेत आणि ही सदिच्छा भेट होती. दरम्यान, येत्या 2-3 दिवसात काही गौप्यस्फोट होणार आहे का? असा प्रश्न विचारला असता ‘आगे आगे देखो होता है क्या’ असं प्रसाद लाड म्हणाले.

मुंबई महापालिका भाजप ताकदीनं लढणार

मुंबई महापालिका निवडणूक भाजप ताकदीन लढणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्व नेते खिंड लढवतील. यावेळी महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल. भाजपचाच महापौर होईल, असा विश्वासही लाड यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली का? महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र दिसणार का? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे.

‘धनंजय मुंडेंबाबत जे घडलं ते चुकीचं’

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कारासारखा गंभीर आरोप करण्यात आला होता. मात्र, आता तक्रारदार महिला रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. त्यावर बोलताना धनंजय मुंडे यांच्याबाबत जे घडलं ते चुकीचं आहे. अशा प्रवृत्तींना चाप बसायला हवी. संबंधित महिलेची चौकशी झाली पाहिजे आणि तिच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही लाड यांनी केली आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊतांना इशारा

वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन प्रसाद लाड यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी इशारा दिला आहे. नितीन राऊत यांनी वीज बिलाबाबतचं विधान ग्रामपंचायत निवडणुकीच्या आधी करायला हवं होतं. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं हे काँग्रेसचं काम आहे. काँग्रेसची ही भूमिका आता शिवसेनेनं घेतली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे हाल थांबवा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, MSEBच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही, असा इशाराच लाड यांनी नितीन राऊतांना दिला आहे.

संबंधित बातम्या : 

‘शिवसेनेची सत्ता उलथवण्यासाठी शक्य ते सर्व करु’, भाजपचे प्रसाद लाड राज ठाकरेंच्या भेटीला

प्रसाद लाड यांच्या स्वागताला राजपुत्र, मुंबईत भाजप-मनसे युतीचं पहिलं चित्र?

BJP leader Prasad Lad criticizes Shiv Sena MP Sanjay Raut

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.