AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

26 डिसेंबरचा ‘तो’ अग्रलेख, संजय राऊतांच्या जेलचा मार्ग मोकळा करतोय…. नारायण राणेंचा इशारा काय?

कणकवलीत काल झालेल्या भाषणात नारायण राणे यांनी संजय राऊतांना इशारा दिला. ते म्हणाले,  माझ्याकडे कात्रण आहे. वकिलाकडे पाठवून ठेवला आहेत. 

26 डिसेंबरचा 'तो' अग्रलेख, संजय राऊतांच्या जेलचा मार्ग मोकळा करतोय.... नारायण राणेंचा इशारा काय?
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jan 06, 2023 | 11:52 AM
Share

सिंधुदुर्गः संजय राऊत (Sanjay Raut) यांना पुन्हा तुरुंगात जाण्याचा मार्ग मी मोकळा करणार आहे. १०० दिवस जेलमध्ये जाऊन आला तर कमी वाटतायत.. मी २६ डिसेंबरचा तो अग्रलेख (Editorial) जपून ठेवलाय. मी बोललेलं विसरत नसतो. विकलांना ते पाठवून ठेवलंय, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी संजय राऊत यांना दिलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथील कार्यक्रमात नारायण राणे यांनी राऊतांना इशारा दिला. त्यामुळे 26 डिसेंबरच्या त्या अग्रलेखात नेमकं काय होतं, हे धुंडाळल्या जातंय…

मुंबईतील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणांच्या आरोपांखाली संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. 9 नोव्हेंबर रोजी विशेष पीएमएलए कोर्टाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून त्यांची सुटका झाली. त्यानंतर राऊत यांना पुन्हा जेलमध्ये जाण्याचा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.

26 डिसेंबरचा अग्रलेख काय?

सामना या शिवसेनेनं मुखपत्र असलेल्या वृत्तपत्रात संजय राऊत यांनी २६ डिसेंबर रोजी नारायण राणेंना इशारा दिला होता. ठग-पेंढाऱ्यांचे राज्य! या शीर्षकाखाली हा अग्रलेख प्रकाशित करण्यात आला होता. नारायण राणे यांचा अग्रलेखात स्पष्ट उल्लेख नव्हता. पण त्यात लिहिलं होतं.. सिंधुदुर्गात सत्यविजय भिसे, रमेश गोवेकर, अंकुश राणेंचा खून पचवणारे दुसऱ्यांकडे बोट दाखवतात….

या तिन्ही खुनांच्या तपासासाठी श्री फडणवीस एखादी एसआयटी नेमणार असतील तर कोकणातले १०० सांगाडे पुरावे म्हणून त्या एसआयटीसमोर स्वतःच हजर होतील. पण श्रीमान फडणवीस ते करणार नाहीत. ढेकणासंगे हिराबी भंगला अशी त्यांची गत झालेली दिसते…

नारायण राणेंचा इशारा काय?

कणकवलीत काल झालेल्या भाषणात नारायण राणे यांनी संजय राऊतांना इशारा दिला. ते म्हणाले,  माझ्याकडे कात्रण आहे. वकिलाकडे पाठवून ठेवला आहेत.  वाचून विसरणारा मी नाही. दखल घेणारा आहे. वाईट स्वभाव आहे माझा…

प्रत्येक वाक्यन् वाक्य पाहतो. 26 तारखेचा राखून ठेवलाय. संजय राऊतला सोडणार नाही. मी पण केस टाकणार. मी तुरुंगात जाण्याचा रस्ता मोकळा करतोय…

कोकणासाठी काम करणारे जे लोकप्रतिनिधी असतील त्या चांगल्या कामाला मराठी भाषेतले चांगले शब्द वापरा.

Follow Us
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण