AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“भाजपच्या शेतकरी बाजाराला वेगळा न्याय आणि दिशा पटानीला वेगळा, ही तर बेबी पेंग्विनची नाईटलाईफ गॅंग”

आमदार प्रसाद लाड यांनी सुरु केलेल्या शेतकरी आठवडी बाजाराला (Farmer Market) वेगळा न्याय आणि लॉकडाऊनचे नियम तुडवत वरळीत दिशा पटनी यांची शुटींग सुरु असते, तिला वेगळा न्याय ही तर सगळी बेबी पेंग्वीनची नाईटलाईफ गॅंग, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केलीय.

भाजपच्या शेतकरी बाजाराला वेगळा न्याय आणि दिशा पटानीला वेगळा, ही तर बेबी पेंग्विनची नाईटलाईफ गॅंग
नितेश राणे, भाजप आमदार
| Updated on: Mar 07, 2021 | 5:22 PM
Share

मुंबई :  भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सुरु केलेल्या शेतकरी आठवडी बाजाराला (Farmer Market) वेगळा न्याय आणि लॉकडाऊनचे नियम तुडवत वरळीत अभिनेत्री दिशा पटनीची (Disha Patani) शुटींग सुरु असते, तिला वेगळा न्याय ही तर सगळी बेबी पेंग्वीनची नाईटलाईफ गॅंग, अशा शब्दात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh rane) यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. (BJP MLA Nitesh Rane Slam Aaditya Thackeray)

मुंबईत प्रसाद लाड यांच्या संकल्पनेतून शेतकरी आठवडी बाजार भरवण्यात येतोय. महानगरपालिका हे आठवडी बाजार बंद करण्याचे षडयंत्र करत असल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केलाय. महापालिकेच्या भूमिकेविरोधात प्रसाद लाड आणि नितेश राणे यांच्या नेतृत्वात आज आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी मध्यस्थी केली.

शेतकऱ्यांसाठी सुरु असलेला बाजार यांच्या डोळ्यात खुपतो

जर आठवडी बाजार बंद करण्याचा प्रयत्न केला तर येत्या काळात हा संघर्ष वाढेल असा इशारा यावेळी प्रसाद लाड यांनी दिला. तर मुंबईच्या नाईटलाईफला समर्थन करायचे आणि शेतकऱ्यांना त्रास द्यायचा, असे म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली.

पब आणि बारसाठी वेगळा न्याय आणि शेतकऱ्यांना वेगळा न्याय

या राज्यात दोन प्रकारचे न्याय आहेत. पब आणि बारसाठी वेगळा तर शेतकऱ्यांसाठी वेगळा न्याय. वरळीत पब सुरु आहे, बांद्र्यात बार सुरु आहेत. पण यांना शेतकऱ्यांसाठी सुरु असलेला हाजार बंद करायचाय. जर हे सरकार शेतकऱ्यांच्या कामी येत नसेल तर हे सरकार हवं कशाला, असं म्हणत आमदार नितेश राणे यांनी सरकारवर सडकून टीका केली.

…ही तर बेबी पेंग्वीनची नाईटलाईफ गॅंग

लॉकडाऊनचे नियम तुडवत वरळीत दिशा पटनी यांची शुटींग सुरु असते. त्रास फक्त सर्वसामान्यांना आहे मात्र दिशा पटनी, डिनो मोरीया यांना सर्व नियम तुडवण्याची परवानगी आहे. ही सगळी बेबी पेंग्वीनची नाईटलाईफ गॅंग आहे, अश बोचरी टीका नितेश राणे यांनी केली.

(BJP MLA Nitesh Rane Slam Aaditya Thackeray)

हे ही वाचा :

आदित्य ठाकरेंच्या वरळीत दिशा पटानीच्या चित्रपटाचं शुटिंग; मनसेच्या नेत्याने घेतला आक्षेप

West Bengal Election 2021: ममता बॅनर्जींकडून बंगालच्या जनतेचा विश्वासघात, पंतप्रधान मोदींचा घणाघात

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.