आधी चंद्रकांत पाटील-राज ठाकरेंची हातमिळवणी, आता भाजप आमदाराची मनसे कार्यालयाला भेट!

सोलापूर उत्तरचे भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर कार्यालयाला भेट दिली. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आमदार देशमुख यांचं उत्साहात स्वागत केलं. आमदार साहेबांनीही मनसे पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर छानपैकी गप्पा मारल्या.

आधी चंद्रकांत पाटील-राज ठाकरेंची हातमिळवणी, आता भाजप आमदाराची मनसे कार्यालयाला भेट!
भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर शहर मनसे कार्यालयाला भेट दिली...
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 12:28 PM

सोलापूर : राज्य पातळीवर भारतीय जनता पार्टी आणि मनसेच्या युतीची चर्चा आहे. गेल्याच आठवड्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीच्या चर्चा अजूनही सुरुच आहेत. अशातच सोलापूरच्या भाजप आमदाराने आता मनसे कार्यालयाला भेट दिली आहे. त्यामुळे भाजप-मनसे युतीच्या चर्चेला पुन्हा एकदा हवा मिळाली आहे.

भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांची मनसे कार्यालयाला भेट!

सोलापूर उत्तरचे भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर कार्यालयाला भेट दिली. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आमदार देशमुख यांचं उत्साहात स्वागत केलं. आमदार साहेबांनीही मनसे पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर छानपैकी गप्पा मारल्या. त्यामुळे मनसे भाजपचं मिलन नक्की होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगायला सुरुवात झाल्या आहेत.

मनसेचं निमंत्रण, भाजप आमदार पाहुणचाराला हजर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत माझे जुने संबंध आहेत… त्यांनीच मला भेटीचे निमंत्रण दिले होते, असा खुलासा आमदार विजयकुमार देशमुख यांनी केला आहे. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भेटीसाठी निमंत्रण दिलं होतं, त्यांच्या आग्रह होता. आज कार्यालयाला भेट देऊन त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केल्याचं आमदार देशमुख यांनी सांगितलं.

सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका आणि शहरातील इतर घडामोडीवर यावेळी मनसे च्या कार्यकर्त्यांबरोबर भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांची चर्चा झाली. मात्र युती किंवा आघाडी यावर कसली चर्चा झाली नसल्याचं आमदार विजयकुमार देशमुख यांनी स्पष्ट केलं.

मागील आठवड्यात चंद्रकांत पाटील-राज ठाकरे भेट

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मागील आठवड्यात भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाली. या भेटीत आमची राजकीय चर्चा झाली. पण मनसे-भाजपच्या युतीचा या भेटीत प्रस्ताव देण्यात आलेला नाही. तसेच युतीवर चर्चाही झाली नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. राज ठाकरेंनी परप्रांतियांची भूमिका बदलल्याशिवाय चर्चा होणार नाही, असं मी गेल्या वर्षभरापासून सांगितलं आहे. त्यावर त्यांनी मला त्यांच्या भाषणाची क्लिप पाठवली. मी ती क्लिप ऐकली. त्यावरुन आमच्यात चर्चा झाली. ही सदिच्छा भेट होती. राजकीय चर्चा झाली. पण या भेटीत युतीचा प्रस्ताव नाही, असं पाटील यांनी सांगितलं.

(BJP MLA Vijaykumar Deshmukh Visit MNS Office At Solapur)

संबंधित बातम्या  

‘ती’ भेट टाळता आली असती, केंद्रीय भाजप नेत्यांचे चंद्रकांत पाटलांना अप्रत्यक्ष निर्देश?

राज ठाकरे माझ्या घरी चहाला आले तर तो माझ्यासाठी सर्वात मोठा दिवस असेल : चंद्रकांत पाटील

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर दिल्लीत दाखल; दिल्ली दरबारी भाजपची काय खलबतं होणार?

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.