मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीच्या संदर्भात केलेल्या विधानाचा संदर्भ देऊन भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधीची खेळी केल्याचा कयास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी बांधत राजकीय खेळी केल्याचे बोललं होतं. त्यावरून राजकीय वर्तुळात पहाटेचा शपथविधी चर्चेचा विषय ठरत आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथविधी घेऊ राज्यात नवं सरकार आणलं होतं. अवघ्या 72 तास टिकलेलं हे सरकार संपूर्ण देशभरात चर्चेत आलं होतं. त्यानंतर राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी शरद पवार यांनी खेळी खेळली होती अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांच्या विधानानंतर ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.