शिवसेनेने सोमय्यांचा पत्ता कापला अन् नगरसेवकाला लोकसभेची लॉटरी लागली, जाणून घ्या कोण आहेत मनोज कोटक?

Manoj Kotak | त्यांचा जन्म गुजराती कुटुंबात झाला असला तरी त्यांचे बालपण मुलुंडसारख्या मराठीबहुल भागात गेले. त्यामुळे मनोज कोटक यांना मराठी भाषेची सुरुवातीपासूनच जाण होती. त्यामुळे राजकारणात त्यांनी गुजराती आणि मराठी हा समन्वय व्यवस्थित साधला.

शिवसेनेने सोमय्यांचा पत्ता कापला अन् नगरसेवकाला लोकसभेची लॉटरी लागली, जाणून घ्या कोण आहेत मनोज कोटक?
मनोज कोटक, भाजप खासदार
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 8:43 AM

मुंबई: गेल्या काही महिन्यांतील घडामोडी पाहता शिवसेना आणि भाजपची पुन्हा युती होण्याची शक्यता बऱ्यापैकी मावळली आहे. मात्र, एकेकाळी महाराष्ट्रात या दोन्ही पक्षांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा सफाया केला होता. 2014 साली भाजप-शिवसेना युतीची सत्ता आल्यानंतरही शिवसेना आणि भाजपमध्ये सातत्याने कुरबुरी सुरु होत्या. या दोघांचे संबंध तुटेपर्यंत ताणले जायचे. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चेनंतर सारे काही आलबेल व्हायचे, असा सिलसिला बराच काळ सुरु होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीही काहीशी अशीच परिस्थिती होती. त्यावेळी शिवसेनेने स्वबळाची भाषा सुरु केली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपला शिवसेनेची अत्यंत गरज होती. त्यासाठी भाजपचे चाणक्य अमित शाह यांना मातोश्रीवर जावे लागले होते. बरीच समजूत काढल्यानंतर शिवसेना भाजपशी युती करण्यासाठी राजी झाली होती. मात्र, यावेळी शिवसेनेने भाजपसमोर काही अटी ठेवल्या होत्या. यापैकी एका अटीमुळेच भाजपचे नगरसेवक मनोज कोटक यांना खासदारकीची लॉटरी लागली होती.

राज्यात 2014 साली युतीची सत्ता आल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये सातत्याने एकमेकांविरुद्ध कुरघोडीचे राजकारण केले जात होते. 2017 सालच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत या गोष्टी शिगेला पोहोचल्या होत्या. त्यावेळी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर थेटपणे वार करणाऱ्या नेत्यांमध्ये ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या आघाडीवर होते. किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना थेट माफियाची उपमा दिली होती. 2019 साली किरीट सोमय्यांना कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची उमेदवारी द्यायची नाही, अशी अट भाजपला मान्य करायला लावून शिवसेनेने सोमय्यांचा हिशेब चुकता केला होता. त्यामुळे भाजपने शेवटच्या क्षणी मनोज कोटक यांना उमेदवारी देऊ केली होती. किरीट सोमय्या यांच्यासारख्या कसलेल्या खासदाराचा पत्ता कट करून मनोज कोटक यांना उमेदवारी मिळणे, हा तेव्हा सर्वांसाठीच अनपेक्षित धक्का ठरला होता.

कोण आहेत मनोज कोटक?

मनोज कोटक यांचा जन्म 25 डिसेंबर 1972 रोजी झाला. मनोज कोटक यांच्या राजकीय कारकीर्दीचा प्रारंभ मुंबई महानगरपालिकेतून झाला. त्यांचा जन्म गुजराती कुटुंबात झाला असला तरी त्यांचे बालपण मुलुंडसारख्या मराठीबहुल भागात गेले. त्यामुळे मनोज कोटक यांना मराठी भाषेची सुरुवातीपासूनच जाण होती. त्यामुळे राजकारणात त्यांनी गुजराती आणि मराठी हा समन्वय व्यवस्थित साधला.

मनोज कोटक यांचा राजकीय प्रवास

पालिकेच्या राजकारणातही मनोज कोटक यांनी झपाट्याने प्रगती केली. ते काही काळ पालिकेतील शिक्षण, एमएमआरडीए आणि स्थायी समितीचे सदस्य होते. मराठी मतदारांशी सहजपणे संवाद साधता येत असल्याने 2014 सालीही मनोज कोटक यांना आयती संधी चालून आली होती. त्यावेळी मुंबई महानगरपालिकेत दिलीप पटेल यांना भाजपच्या गटनेतेपदी नेमण्यात आले होते. त्याचवेळी काँग्रेसकडून प्रवक्तेपदी प्रवीण छेडा यांची नियुक्ती करण्यात आली होती. या मुद्द्यावरुन शिवसेनेने ‘सामना’तून काँग्रेसला लक्ष्य केले होते. काँग्रेस प्रवक्तेपदी गुजराती व्यक्तीची नेमणूक कशी काय करु शकते, असा सवाल शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला होता. तेव्हा भाजपनेही काळाची पावले ओळखून पक्षात संघटनात्मक बदल केले होते. त्यावेळी भाजपने दिलीप पटेल यांच्याकडून गटनेतेपद काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गुजरातीच असलेल्या पण मराठी मतदारांशी संवाद ठेवून असलेल्या मनोज कोटक यांची गटनेतेपदी नियुक्ती केली होती.

देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू

मनोज कोटक हे सुरुवातीपासूनच देवेंद्र फडणवीस यांच्या गोटातील मानले जातात. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मनोज कोटक यांनी दोनवेळा विधानपरिषदेवर निवडून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हे दोन्ही प्रयत्न अपयशी ठरले होते. भांडुप विधानसभा मतदारसंघातूनही मनोज कोटक यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. अखेर 2019 मध्ये किरीट सोमय्या यांचा पत्ता कट झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मनोज कोटक यांना तिकीट मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

संबंधित बातम्या:

मनोज कोटक पहाटेपासून प्रचाराच्या रिंगणात, सेना नेते चार हात लांबच!

ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांना डच्चू, भाजपकडून मनोज कोटक यांना उमेदवारी!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.