पं. नेहरुंच्या जन्मदिनी ‘बालदिन’ नको, भाजप खासदार मनोज तिवारींची मागणी

शिखांचे दहावे गुरु गुरुगोविंद सिंह साहिबादादा फतेहसिंग यांचा शहादत दिवस अर्थात 26 डिसेंबर हा बालदिन म्हणून साजरा करावा, असं मनोज तिवारींनी लिहिलं आहे.

पं. नेहरुंच्या जन्मदिनी 'बालदिन' नको, भाजप खासदार मनोज तिवारींची मागणी
अनिश बेंद्रे

|

Dec 27, 2019 | 9:13 AM

नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त 14 नोव्हेंबरला ‘बालदिन’ साजरा करणं बंद करा, बालदिनाची तारीख 26 डिसेंबर करा, अशी मागणी भाजपचे खासदार, दिल्ली भाजपाध्यक्ष आणि भोजपुरी चित्रपटांचे सुपरस्टार मनोज तिवारी यांनी केली (Manoj Tiwari Childrens Day) आहे.

14 नोव्हेंबर हा जवाहरलाल नेहरु यांचा वाढदिवस देशभरात ‘बालदिन’ म्हणून साजरा केला जातो. त्याऐवजी शिखांचे दहावे गुरु गुरुगोविंद सिंह साहिबादादा फतेहसिंग यांचा शहादत दिवस अर्थात 26 डिसेंबर हा बालदिन म्हणून साजरा करावा, असं मनोज तिवारींनी लिहिलं आहे.

‘भारतात बऱ्याच मुलांनी मोठे त्याग केले आहेत. परंतु त्यापैकी साहिबजादे जोरावर सिंह आणि साहिबजादे फतेह सिंह (गुरु गोबिंदसिंह यांचे पुत्र) यांनी केलेले बलिदान सर्वोच्च आहे. 26 डिसेंबर 1705 या दिवशी त्यांनी धर्माच्या रक्षणासाठी पंजाबच्या सरहिंदमध्ये आपले प्राण अर्पण केले’ असं मनोज तिवारी यांनी पत्रात लिहिलं आहे.

पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या वाढदिवशी बालदिन साजरा करण्याची परंपरा 1956 पासून सुरु झाली. पंडित नेहरु यांचं लहान मुलांवर निरतिशय प्रेम होतं. मुलांच्या लाडक्या ‘चाचा नेहरुं’च्या जन्मदिनी मुलांचा उत्सव साजरा करण्याची संकल्पना भारतात रुजली.

हेही वाचा : आता मीम बनणार, सूर्यग्रहण पाहतानाच्या मोदींच्या फोटोवर प्रतिक्रिया, मोदी म्हणाले…

नेहरुंच्या निधनाआधी संयुक्त राष्ट्रसंघांद्वारे साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय बालदिन 20 नोव्हेंबरला साजरा होत असे. मात्र पंडित नेहरुंनी लहान मुलांच्या शिक्षणासाठी दिलेल्या योगदानामुळे संसदेत ठराव पास करण्यात आला होता.

ऐन दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मनोज तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बालदिनाची तारीख बदलण्यासाठी पत्र लिहिलं आहे. दिल्ली मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत तिवारी आघाडीवर मानले जातात.

भाजपकडून नेहरुंच्या नावाला सातत्याने विरोध होताना दिसतो. भाजप नेत्यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंवर बोचरी टीकाही केली आहे. आता मनोज तिवारींच्या मागणीवर भाजप काय निर्णय घेणार (Manoj Tiwari Childrens Day), हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें