कंगना आली, सेनेचं नाक कापलं आणि घरी गेली, राणेंचा हल्ला, मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली यासाठी सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार, अशी टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी केली. (Narayan Rane on Kangana Kangana Ranaut and ShivSena)

कंगना आली, सेनेचं नाक कापलं आणि घरी गेली, राणेंचा हल्ला, मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

मुंबई : “बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत मुंबईत आली. तिच्या घरी गेली. तिने प्रतिक्रिया दिली आणि शिवसेनेचं नाक कापलं. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था आहे का? हा माझा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे. कंगना जर मुंबई महाराष्ट्राचा अपमान करत असेल, तर कायद्यात तरतूद आहे, कारवाई करा. मुख्यमंत्री मातोश्रीच्या पिंजऱ्यात कशाला बसलाय,” अशी खोचक टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली. (Narayan Rane on Kangana Kangana Ranaut and ShivSena)

“आज कंगनाविरोधात भारतीय कामगार सेनेचे कर्मचारी एअरपोर्टवर आंदोलन करत होते. मोजून 67 जण होते. आमच्या लोकांनी मोजले. मुंबईत मराठी माणूस फक्त 30 टक्के उरलेत. एकही मतदारसंघ मराठी माणसाच्या जीवावर निवडून येऊ शकत नाही. कंगना जर मुंबई महाराष्ट्राचा अपमान करत असेल तर कायद्यात तरतूद आहे, कारवाई करा. मुख्यमंत्री मातोश्रीच्या पिंजऱ्यात कशाला बसला आहे. कंगना मुंबईत आली, घरी गेली, प्रतिक्रिया दिली आणि शिवसेनेचं नाक कापलं. शिवसेना खासदार संजय राऊतला नाक तरी आहे का?” असेही राणे यावेळी म्हणाले.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली यासाठी सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार

“राज्य सरकार हे मराठा आरक्षण देण्याच्या मानसिक स्थितीत नव्हतं. त्यामुळेच त्यांनी सुप्रीम कोर्टात नामांकित वकील दिले नाहीत. राज्य सरकारने नात्या-गोत्यातले साधे वकील उभे केले. चांगला वकील सुप्रीम कोर्टात दिला नाही, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली यासाठी सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार,” अशी टीका नारायण राणे यांनी केली.

“राज्याचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन संपलं. विधीमंडळाचे अधिवेशन दोन दिवस हे मनाला पटत नाही. पण कोरोनामुळे जरी आपण धरलं दोन दिवस हे अधिवेशन झालं. त्याची थोडी चर्चा करणे आवश्यक आहे. राज्याच्या जनतेला दोन दिवशीय अधिवेशनाने काय दिले हा विषय महत्त्वाचा आहे,” असे नारायण राणे म्हणाले. (Narayan Rane on Kangana Kangana Ranaut and ShivSena)

“माझ्याकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांची भाषण आहेत. पहिला दिवस अधिवेशन अर्धा दिवस चाललं. त्यावेळी शोक प्रस्ताव मांडून ते दुपारी संपवलं. दुसऱ्या दिवशी पुरवण्या मागण्या, 12 बिलं एवढं कामकाज असताना, सत्ताधाऱ्यांनी अधिवेशनात हैदोस घातला. त्यामुळे अधिवेशनला वेळ मिळाला नाही.”

“अधिवेशनात बिलं ही चर्चेशिवाय मंजूर झाली. पुरवण्या मागण्यांवर चर्चा नाही. देवेंद्र फडणवीसांनी यांनी अभ्यासपूर्ण भाषण केलं. त्यांनी कोरोना स्थितीवर प्रकाशझोत टाकला. पण उद्धव ठाकरेंनी एकाही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. बेकारी वाढतेय, शेतकऱ्यांचे, मजूरांचे प्रश्न आहेत. हे सर्वजण अडचणीत आहे. त्यांच्या घरात आज अन्न नाही, यावर का बोलले नाहीत. सरकार म्हणून काय करणार याबद्दल काही बोलले नाही,” अशी टीका नारायण राणेंनी केली.

पुढच्यावेळी मातोश्रीच्या गच्चीवर दोन तासाचं अधिवेशन घ्या

“कोकणात वादळाच्या मदतीचे आजपर्यंत एकही रुपया पोहोचलेला नाही. मुख्यमंत्र्यांपेक्षा एखादा सरपंच चांगला बोलला असता,” असे नारायण राणे म्हणाले.

“राज्य सरकारने दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन घेतलं नसतं, तर बरं झालं असतं. अशाप्रकारे जर पुढच्यावेळी अधिवेशन घेण्याची वेळ आली तर ते मातोश्रीच्या गच्चीवर घ्या. जवळपास दोन-अडीच तासांचं. विरोधीपक्षाला 15 मिनिटं, सत्ताधाऱ्यांना इतर वेळ, याला काही अर्थ नाही. त्याला मी अर्थहीन अधिवेशन म्हणेन,” अशी टोला नारायण राणेंनी लगावला.(Narayan Rane on Kangana Kangana Ranaut and ShivSena)

संबंधित बातम्या : 

राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी भाजपची मोर्चेबांधणी, उमेदवार ठरला, खासदारांना व्हीप

Maratha Reservation | मराठा आरक्षण सुनावणी घटनापीठाकडे वर्ग, वैद्यकीय प्रवेश-भरतीत तूर्त आरक्षण नाही

Published On - 5:39 pm, Wed, 9 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI