राऊतांनी दिमाखात ट्विट केलं, पूनम महाजनांनी मर्दानगी काढली, राऊतांनी डिलीट केलं, काय होतं त्यात?

राऊतांनी दिमाखात ट्विट केलं, पूनम महाजनांनी मर्दानगी काढली, राऊतांनी डिलीट केलं, काय होतं त्यात?
पूनम महाजन संजय राऊत

जय राऊत (Sanjay Raut ) यांनी भाजपला उत्तर देताना एक व्यंगचित्र ट्विट केलं होतं. त्या व्यंगचित्रावरुन वाद सुरु होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी नंतर ते ट्विट डिलीट केलं.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jan 25, 2022 | 8:14 AM

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधला. या संवादामध्ये हिंदुत्त्वाच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपला (BJP) फटकारलं होतं. ठाकरे यांनी केलेली टीका भाजपच्या जिव्हारी लागली होती. भाजपकडून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. भाजपतर्फे झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी शिवसेनेकडून संजय राऊत पुढे आले. संजय राऊत यांनी देखील शिवसेना राम मंदिर आंदोलनात कुठं होती. राम मंदिराराच्या लढाईत शिवसेना नव्हती तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आरोपी कसं करण्यात आलं?, असा सवाल केला होता. संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी भाजपला उत्तर देताना एक व्यंगचित्र ट्विट केलं होतं. त्या व्यंगचित्रावरुन वाद सुरु होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी नंतर ते ट्विट डिलीट केलं मात्र भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. “स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका”, अशा शब्दात पूनम महाजन यांनी संजय राऊत यांना उत्तर दिलं आहे.

संजय राऊत यांचं ट्विट काय होतं?

शिवसेना भाजपच्या नव्या वादाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी एक ट्विट केलं होतं. त्या ट्विटमध्ये कोण कोणामुळे वाढले? उघडा डोळे…बघा नीट… असं कॅप्शन संजय राऊत यांनी त्या ट्विटला दिलं होतं. संबंधित ट्विटमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एका खुर्चीवर बसल्याचं दिसून येत आहे. शिवसेना प्रमुखांचे पाय पुढच्या एका खुर्चीवर असून ते हॅव्ह अ सीट असं विचारत असल्याचं वर लिहिण्यात आलं आहे. बाजूला एक छोट स्टूल देखील दिसून येतं. समोर एक व्यक्ती उभी राहिल्याचं व्यंगचित्रात दिसून येतं. या व्यंगचित्रावरुन वादाला सुरुवात होताच संजय राऊत यांच्याकडून ते ट्विट डिलीट करण्यात आल्याचं दिसतंय.

पूनम महाजन यांचं प्रत्युत्तर

संजय राऊत यांचं ट्विट समोर आल्यानंतर भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि खासदार पूनम महाजन यांनी संजय राऊत यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय प्रमोद महाजन या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती.नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका, असा इशारा वजा सल्ला देखील पूनम महाजन यांनी केला. “स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका.” असं पूनम महाजन म्हणाल्या.

इतर बातम्या:

NMC Election | नागपुरात काँग्रेसचा डिजिटल मतदार सदस्य नोंदणीवर भर; भाजपचा बैठकांवर जोर का?

Aurangabad: दानवेंनी फडक्यात बांधून आणला भाकरी अन् ठेचा, औरंगाबादेत भाजपचे गावागावांत डबा पार्टीचे आयोजन!

BJP MP Poonam Mahajan slam Shivsena MP Sanjay Raut over tweet cartoon about Shivsena BJP alliance

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें