भाजप खासदाराच्या सुरक्षा रक्षकांची टोल कर्माचाऱ्यांना मारहाण, हवेत गोळीबार

भाजप खासदार आणि अनुसूचित जातीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामशंकर कठेरियांच्या सुरक्षा रक्षकांनी आग्रा येथील टोलनाक्याजवळ हवेत गोळीबार केला.

भाजप खासदाराच्या सुरक्षा रक्षकांची टोल कर्माचाऱ्यांना मारहाण, हवेत गोळीबार

नवी दिल्ली : भाजप खासदार आणि अनुसूचित जातीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामशंकर कठेरियांच्या सुरक्षा रक्षकांनी आग्रा येथील टोलनाक्याजवळ हवेत गोळीबार केला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कठेरिया यांचा ताफा टोलनाक्यावरुन जात असताना टोल कर्माचारी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद झाल्याने ही घटना घडली. यावेळी कठेरियाही येथे उपस्थित होते.

या घटनेचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे. टोल कर्माचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे अनेकजण कठेरिया यांच्यावर टीका करत आहेत. कठेरियांच्या सुरक्षा रक्षकांनी मारहाण करत हवेत गोळीबारही केला. यामुळे परिसरात भितीचं वातावरण निर्माण झाले होते.

खासदार कठेरिया आपल्या ताफ्यासोबत आग्रा येथील टोलनाक्यावरुन जात होते. यावेळी त्यांच्या गाडीशिवाय त्यांच्यासोबत 5 छोट्या गाड्या आणि 1 बस होती. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी एक-एक गाडी पुढे जाण्यास सांगितली. यावरुन कठेरियांच्या सुरक्षा रक्षकांचा टोल कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला.

हा वाद वाढल्यामुळे थेट कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. टोल नाक्यावरील प्रमुखाने या घटनेची तक्रार केली. यामध्ये ते म्हटले की, “रामशंकर कठेरिया यांचा ताफा व्हीआयपी लेनमधून जात नव्हता. यामुळे टोल कर्माचाऱ्यांनी एक-एक गाडी पुढे जाण्यास सांगितली, तेव्हा कठेरिया यांच्या सुरक्षा रक्षकांनी थेट कर्माचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. कठेरिया यांना विनंती केली असता त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी हवेत गोळीबार केला”.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *