शिर्डीचं साई मंदिर खुलं करा, अन्यथा कोर्टात जाऊ, भाजप खासदार सुजय विखेंचा इशारा

राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र सुजय‌ विखे पाटील यांनी राज्यातील मंदिरे खुली करण्याची मागणी केली आहे. Sujay Vikhe demands to open Shirdi Mandir

शिर्डीचं साई मंदिर खुलं करा, अन्यथा कोर्टात जाऊ, भाजप खासदार सुजय विखेंचा इशारा
Follow us
| Updated on: Aug 22, 2020 | 1:13 PM

अहमदनगर : माजीमंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र खासदार सुजय‌ विखे पाटील यांनी राज्यातील मंदिरे खुली करण्याची मागणी केली आहे. शिर्डीचे साई मंदिरही खुले करावे अन्यथा न्यायालयात‌‌‌ जाण्याचा‌ इशारा, सुजय विखे यांनी दिला आहे. (Sujay Vikhe demands to open Shirdi Mandir)

राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरा कारखाना येथे सपत्निक श्री गणेशाची विधीवत स्थापना केली. यावेळी सुजय विखे यांच्यासह कारखान्याचे संचालक मंडळ तसेच‌ सभासद यावेळी उपस्थित होते. साई मंदिरासह इतरही मंदिरे खुले करण्याची मागणी विखे पिता-पुत्रांनी केली.

राज्य‌ सरकारने मॉल उघडले, व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली, त्यामुळे मंदिरे बंद ठेवणे उचित नाही. आवश्यक उपाययोजना‌‌ करणाऱ्या सर्वच मंदिरांना आता खुले करा, त्यामुळे परिसरातील रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं यावेळी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

“शिर्डीच‌ं सर्व अर्थकारण साई मंदिरावर अवलंबून आहे. केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार देशातील तिरुपती, वैष्णोदेवी मंदिर सुरु झाले. शिर्डी संस्थान आर्थिकदृष्ट्या‌ सक्षम आहे. ऑनलाईन दर्शन सुविधा असल्याने मंदिर सुरु करणे सोयिस्कर असून, गर्दी न होता ठराविक संख्येने भाविकांना दर्शन देणे शक्य आहे. सर्व ग्रामस्थांच्यावतीने मंदिर खुले करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत. मात्र सप्टेंबरपर्यंत मागणी मान्य न झाल्यास न्यायालयात जाणार असल्याचं” सुतोवाच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलं.

(Sujay Vikhe demands to open Shirdi Mandir)

संबंधित बातम्या 

स्वत:च्या स्वार्थासाठी तीन पक्ष एकत्र, काम करता येत नसेल तर सत्ता भाजपकडे सुपूर्द करा : सुजय विखे

सुशांत सिंह प्रकरणात ईडीनं 8 तास चौकशी, ते गप्पा मारत होते का? थोडं थांबा, महिनाभरात सत्य समोर येणार : सुजय विखे 

Non Stop LIVE Update
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.