‘आरोग्य कर्मचाऱ्यांनी चोख काम केल्यामुळे नगरचे लोक जिवंत’, सुजय विखेंचा निलेश लंकेंना टोला, तर ‘आम्ही जिल्ह्यातही सक्षम’, लंकेंचा थेट इशारा!

'आरोग्य कर्मचाऱ्यांनी चोख काम केल्यामुळे नगरचे लोक जिवंत', सुजय विखेंचा निलेश लंकेंना टोला, तर 'आम्ही जिल्ह्यातही सक्षम', लंकेंचा थेट इशारा!
आमदार निलेश लंके, खासदार सुजय विखे पाटील

अहमदनगर जिल्ह्यात भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत.

कुणाल जायकर

| Edited By: सागर जोशी

Jul 20, 2021 | 3:20 PM

अहमदनगर : नगर जिल्ह्यात भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. कोरोना संकटाच्या काळात आमदार लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरची चर्चा जागतिक पातळीवर झाली. त्यामुळेच त्यांचा लंडन बूक ऑफ रेकॉर्डने सन्मानही करण्यात आला आहे. त्यावर बोलताना आम्हालाही लंडन बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र मिळालं, मात्र आम्ही ते कुणाला दाखवत बसलो नाही, असा टोला सुजय विखे यांनी निलेश लंकेंना लगावला आहे. (Sujay Vikhe Patil criticizes Nilesh Lanke and Nilesh Lanke warns Sujay Vikhe Patil)

कोरोना नियंत्रणासाठी आमदार किंवा खासदार काय करु शकतो? तर प्रत्येक शासकीय कर्मचारी, आरोग्य कर्मचाऱ्याने त्यांचं काम चोख बजावल्यामुळे नगरची लोकं आझ जिवंत आहेत. हे काही फक्त एका माणामुळे किंवा आमदार, खासदारामुळे नाही, अशी टीका सुजय विखे यांनी लंके यांच्यावर केली आहे. तसंच आम्ही कधीही आपण देव आहोत असं म्हणालो नाही, असंही सुजय विखे यांनी म्हटलंय.

निलेश लंकेंचा सुजय विखेंना इशारा

दरम्यान, सुजय विखे पाटील यांच्या टीकेला आमदार निलेश लंके यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कोरोना संकटाच्या काळात 185 कोटींचा फायदा केला, तर 17 हजार लोक वाचवली हे बोलायला सोपं असतं. त्यांनी रेमडेसिव्हीर विमानातून आणले पण कुठे वाटले ते दाखवा, असं आव्हानच लंके यांनी दिलं आहे. आधी तालुक्यातील लोकांना भीती वाटत होती आता जिल्ह्यातील लोकांना भीती वाटत आहे, असा टोलाही त्यांनी सुजय विखे यांना लगावला आहे. त्यांच्या विखे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही आपण नीट केलं आहे. वेळ आली तर आम्ही जिल्ह्यातही सक्षम आहोत, असा थेट इशाराच लंके यांनी सुजय विखेंना दिला आहे.

अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीकडून निलेश लंकेंना ताकद?

लंकेंच्या या इशाऱ्यामुळे निलेश लंके यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत तर दिले नाहीत ना? अशी चर्चा आता नगर जिल्ह्यात सुरु झाली आहे. निलेश लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही निलेश लंके यांच्या कोरोना काळातील कामाचं कौतुक केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निलेश लंके यांना अहमदनगर जिल्ह्यात बळ दिलं जाण्याची शक्यता लंके यांच्या वक्तव्यानंतर व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

आमदारांच्या बेडवर कार्यकर्ते, दिलदार निलेश लंकेंची माणुसकी, झोपेतून न उठवता स्वत: सतरंजीवर झोपले!

सुजय विखे पाटलांची गुपचूप मोहीम, दिल्लीवरुन विशेष विमानाने इंजेक्शनचा मोठा साठा नगरमध्ये

Sujay Vikhe Patil criticizes Nilesh Lanke and Nilesh Lanke warns Sujay Vikhe Patil

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें