AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप खासदाराचे नाव सपाच्या यादीत? ‘या’ मतदारसंघातून दिली उमेदवारी, नेमकं प्रकरण काय?

पहिल्या यादीत नाव न आल्याने भाजपचे अनेक खासदार नाराज आहेत. तर, ज्यांची तिकिटे कापण्यात आली आहेत अशा खासदारांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, उत्तरप्रदेशमधील भाजपच्या एका बड्या नेत्याचे नाव समाजवादी पक्षाच्या यादीमध्ये झळकल्याने एकच चर्चा सुरु झालीय.

भाजप खासदाराचे नाव सपाच्या यादीत? 'या' मतदारसंघातून दिली उमेदवारी, नेमकं प्रकरण काय?
VARUN GANDHI Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Mar 18, 2024 | 7:06 PM
Share

उत्तर प्रदेश | 18 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या उमेदवारांचीही एक यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये भाजप खासदार वरुण गांधी यांना पिलीभीत मतदार संघातून तिकीट जाहीर करण्यात आले आहे. समाजवादी पक्षाची ही यादी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. गेले काही महिने पक्षाविरोधात बोलणारे वरुण गांधी यांना या निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे वरून गांधी यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला की काय अशीही चर्चा उत्तर प्रदेशमध्ये होत आहे.

समाजवादी पक्षाच्या उमेदवार यादीमध्ये वरुण गांधी यांच्यासोबत आणखी दोन नावे आहेत. ही यादी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या यादीत वरुण गांधी यांना पीलीभीतमधून पुन्हा सपाच्या तिकिटावर उमेदवार करण्याचा दावा करण्यात आला आहे. यासोबतच जौनपूरमधून श्रीकला रेड्डी आणि मछली शहरातून रागिणी सोनकर यांना तिकीट देण्यात आल्याचे यादीत म्हटले आहे. श्रीकला रेड्डी या माजी खासदार धनंजय सिंह यांच्या पत्नी आहेत. ही यादी पोस्ट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

वरुण गांधी सपाकडून निवडणूक लढवणार?

ही यादी आल्यानंतर भाजप खासदार वरुण गांधी समाजवादी पक्षात सामील झाले आहेत की काय, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी ते सपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार का? त्यांचे तिकीट भाजपकडून कापले जाणार हे निश्चित झाले आहे का? असे प्रश्न उपस्थित झाले आहे. मात्र, या दाव्यात किती तथ्य आहे याचे उत्तर समाजवादी पक्षाने दिले आहे.

वरुण गांधींना सपाचे तिकीट देण्याच्या दाव्यावर सपाच्या प्रवक्त्यांनी अशी कोणतीही यादी जाहीर करण्यात आलेली नाही असे स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही यादी बनावट आहे, त्यापासून सावध राहा, असे पक्षाने म्हटले आहे.

समाजवादी पक्षाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर ‘कृपया सावधगिरी बाळगा! समाजवादी पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची यादी फक्त पक्षाच्या पेजवर पाठवली जाते. जी यादी पक्षाच्या एक्स आणि फेसबुक पेजवर आहे ती अधिकृत आहे आणि इतर सर्व याद्या बनावट आहेत, असे म्हटले आहे.

दरम्यान, पक्षविरोधी वक्तव्यांमुळे वरुण गांधी अनेकदा चर्चेत आले आहेत. त्यामुळे त्यांचे यावेळी तिकीट कापण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपने वरुण गांधी यांच्या पिलीभीत मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. तर, सपानेही अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे वरुण गांधी यांचे भाजपने तिकीट नाकारले तर सपा त्यांना रिंगणात उतरवू शकते, अशीही एक अटकळ बांधली जात आहे.

Follow Us
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...