AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संघाच्या मदतीने बारामतीचा गड भेदण्याची भाजपची रणनीती

लोकसभा निवडणुकीत भाजपने बारामती मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला होता. आता विधानसभा निवडणुकीत देखील बारामती काबीज करण्यासाठी भाजपने व्यूहरचना आखली आहे. यावेळी भाजपचे संघाच्या मदतीने बारामती जिंकण्याचे मनसुबे आहेत. त्यापार्श्वभूमीवर संघ आणि भाजपमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू आहे.

संघाच्या मदतीने बारामतीचा गड भेदण्याची भाजपची रणनीती
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Aug 28, 2019 | 8:10 PM
Share

पुणे: लोकसभा निवडणुकीत भाजपने (BJP) बारामती मतदारसंघ (Baramati Constituency) प्रतिष्ठेचा केला होता. आता विधानसभा निवडणुकीत देखील बारामती काबीज करण्यासाठी भाजपने व्यूहरचना आखली आहे. यावेळी भाजपचे संघाच्या (RSS) मदतीने बारामती जिंकण्याचे मनसुबे आहेत. त्यापार्श्वभूमीवर संघ आणि भाजपमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू आहे.

शत प्रतिशत भाजपचा नारा देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचा पारंपारिक गड बारामती काबीज करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी भाजपचे जोरदार रणनिती आखली आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही पवार काका-पुतण्याची (Sharad Pawar – Ajit Pawar) कोंडी करण्यासाठी भाजपने रणनीती तयार केली आहे. ज्यामध्ये संघाचा मोठा सहभाग आहे.

लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या पराभवासाठी चद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बारामतीत मुक्काम ठोकला होता. त्यावेळीही पवार काका-पुतण्याची भाजपने जोरदार कोंडी केली. आता विधानसभेत बारामती जिंकायची असेल, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत घ्यावी लागेल, असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. यासाठी पुण्यात संघाच्या मोतीबागेतील कार्यालयात बैठका होत आहेत.

रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे काही स्थानिक नेते आणि संघाचे पदाधिकारी यांच्यात मंगळवारी बैठक झाली. यामध्ये बारामतीत कशा पद्धतीने यंत्रणा तयार करायची, उमेदवार कोण असणार यावर चर्चा झाली.

पवारांची बारामती सर करणं भाजपसाठी तितकं सोपं नाही. त्यामुळे संघाची मदत घेतली जात आहे. बारामती जिंकली नाही, तरी पवार काका-पुतण्यांची बारामतीत कोंडी करणे हाच खरा भाजपचा मुख्य उद्देश आहे. तो उद्देश लोकसभा निवडणुकीत यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले. भाजप संघाच्या मदतीने तशीच रणनिती विधानसभा निवडणुकीतही आखत आहे.

Follow Us
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण