पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपला स्पष्टवक्तेपणा आणि विरोधकांना सडेतोड उत्तरं देण्यासाठी ओळखले जातात. मात्र, आज चंद्रकांत पाटील यांचं एक वेगळं रुप पाहायला मिळालं. पाटील यांनी आज अधिकाऱ्यांना थेट चॉकलेट दिलं! त्याचं झालं असं की चंद्रकांत पाटील यांनी आज रात्री पुण्यातील चांदणी चौकात रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. चांदणी चौकातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे रस्त्यावरचे खड्डे लवकर बुजवण्याचे आदेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर आज पाटील यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केली आणि काम पाहून तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याला चॉकलेट दिलं! (Chandrakant Patil inspects road works at Chandni Chowk in Pune)