AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune: अमित शहांच्या उपस्थितीत भाजप पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा 26 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळतेय. अमित शहांच्या उपस्थितीत भाजप पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाईल.

Pune: अमित शहांच्या उपस्थितीत भाजप पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार
Amit Shah and Devendra Fadnavis File photo
| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 1:13 AM
Share

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा 26 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळतेय. अमित शहांच्या उपस्थितीत भाजप पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाईल. यावेळी महापालिका भवनात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन होईल. तसेच पालिकेच्या नव्या इमारतीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शहा यांच्या हस्ते होणार आहे.

शहांच्या उपस्थितीत गणेश कला क्रीडा मंच सभागृहात भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अमित शहांच्या दौऱ्यासंदर्भात आज महापौर बंगल्यावर बैठक पार पडली.

पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पुणे, मुंबईसह महाराष्ट्रात इतर महानगरपालिका निवडणुकी होणार आहेत.

चंद्रकांत पाटील यांची बैठक

आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी नगरसेवक आणि आमदारांच्या नुकतीच बैठक झाली. बैठकीत भाजपचे महाराष्ट्र युनिट अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रलंबित पायाभूत सुविधा प्रकल्पांना मिशन मोडवर गती देण्याचे आणि सार्वजनिक वाहतूक सेवा सुधारण्याचे आवाहन केले.

2014 च्या राज्यात विधानसभा निवडणुकीत, भाजपने पुणे शहरातील सर्व सहा जागा जिंकल्या होत्या, तर 2017 च्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांमध्ये मध्ये जोरदार विजय मिळवला होता.

इतर बातम्या-

राजकारणाच्या गुन्हेगारीबाबत जागृतीसाठी भाजपाच्या राज्यभर 20 हजार सभा, चंद्रकांत पाटलांकडून मेगा प्लॅन जाहीर

नवाब मलिकांचा पुन्हा एकदा समीर वानखेडेंवर निशाणा; आता मलिकांकडून गोसावीच्या ऑडिओ क्लिप उघड

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.