AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परमबीर सिंह न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून राज्य सरकारवर दबाव आणू पाहत आहेत का; संजय राऊतांचा सवाल

परमबीर सिंह यांच्या पत्रावरुन लोकसभा आणि राज्यसभेत भाजपच्या खासदारांनी थयथयाट केला. | Sanjay Raut BJP

परमबीर सिंह न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून राज्य सरकारवर दबाव आणू पाहत आहेत का; संजय राऊतांचा सवाल
संजय राऊत, शिवसेना
| Updated on: Mar 23, 2021 | 11:02 AM
Share

नवी दिल्ली: परमबीर सिंह हे सर्वोच्च न्यायालयाच्या यंत्रणेचा वापर करुन राज्य सरकारवर दबाव आणू पाहत आहेत. तशी वेळ आली तर महाराष्ट्र सरकाराने विचार करायला हवा, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. देशाचे माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभा खासदार रंजन गोगोई यांनी अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळत नाही, दबाव आणला जातो, असे त्यांनी म्हटले होते. मग परमबीर सिंह हेदेखील न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून राज्य सरकारवर असाच दबाव आणू पाहत आहेत का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. (Sanjay Raut hits back BJP over accusations after Parambir singh letter)

ते मंगळवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बचा मुद्दा भाजपकडून राष्ट्रीय स्तरावर उचलण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन भाजपच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. परमबीर सिंह यांच्या पत्रावरुन लोकसभा आणि राज्यसभेत भाजपच्या खासदारांनी थयथयाट केला. मात्र, नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना आयपीएस अधिकारी संजीव भट आणि अधिकारी शर्मा यांनी तत्कालीन सरकारवर अशाच गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. त्यांची ही पत्र आम्ही समोर आणली तर भाजपचे नेते असाच थयथयाट करायला तयार आहेत का, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

‘महाराष्ट्राला एक न्याय आणि गुजरातमध्ये दुसरा न्याय का?

माजी आयपीएस अधिकारी संजीव भट आणि शर्मा यांनी तत्कालीन गुजरात सरकारवर असेच लेटरबॉम्ब टाकले होते. यानंतर संजीव भट यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. तेव्हा भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर कोणतीही कारवाई केली नव्हती. आम्ही ही पत्र समोर आणली तर कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद आणि भाजपचे नेते त्यावर कारवाईची मागणी करतील का? भाजप महाराष्ट्रासाठी एक न्याय आणि गुजरातसाठी दुसरा न्याय, का लावत आहे, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

‘आम्ही ठरवलं तर तुमच्यापेक्षा जास्त राजकारण खेळू शकतो’

अनिल देशमुख हे 15 फेब्रुवारीला नागपुरात होते की मुंबईत असा सवाल विचारल्यानंतर संजय राऊत चांगलेच वैतागले. राज्य सरकारने तारखांची माहिती द्यायला वेगळा विभाग सुरु केलाय का? शरद पवार जे बोलले ते पूर्ण अभ्यास करुनच बोलले. ते लॉजिकल आहे. 15 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी या काळात अनिल देशमुख सक्रिय नव्हते. त्यामुळे या सगळ्यावर प्रश्न उपस्थित करण्यात काही अर्थ नाही, असे राऊत यांनी सांगितले.

भाजपचे नेते गुजरातमध्ये एक न्याय लावतात तर इतर ठिकाणी वेगळा न्याय लावतात. अधिकाऱ्याने लिहलेले पत्र म्हणजे पुरावा नाही. त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. मात्र, भाजप सोयीचे राजकारण करु पाहत आहे. आम्ही ठरवलं तर तुमच्यापेक्षा जास्त राजकारण खेळू शकतो, असा इशाराही यावेळी संजय राऊत यांनी दिला.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही, केंद्र सरकारच बरखास्त करा; संजय राऊतांचं मोठं विधान

(Sanjay Raut hits back BJP over accusations after Parambir singh letter)

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.