AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aditya Thackeray | कितीही थर लावू देत, शिवसेना गडगडणार नाही, वरळीत भाजप दहिहंडीवरून शिवसेनेचं प्रत्युत्तर

भाजपने वरळीत दहिहंडीचं आयोजन केलंय, त्यामुळे आता ठाकरे कुटुंबच रडारवर असल्याचं बोललं जातंय. यावर उत्तर देताना सुनिल शिंदे म्हणाले, ' निवडणूक येऊ देत.. तेव्हा कोण गडगडतेय आणि कोण उभं राहतेय ते कळेल.

Aditya Thackeray | कितीही थर लावू देत, शिवसेना गडगडणार नाही, वरळीत भाजप दहिहंडीवरून शिवसेनेचं प्रत्युत्तर
सुनिल शिंदे, शिवसेना नेतेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 18, 2022 | 2:40 PM
Share

मुंबईः भाजपने कितीही थर लावू देत, वरळीतलीच काय, अख्ख्या मुंबईतली शिवसेना गडगडणार नाही, असं वक्तव्य शिवसेना नेते सुनील शिंदे (Sunil Shinde) यांनी केलंय. महापालिका निवडणुका आणि दहिहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वरळी मतदार संघातच भाजपने यंदा मोठी दहिहंडी लावण्याची तयारी केली आहे. वरळीत शिवसेनेचं (Shivsena) महत्त्व कमी करण्यासाठी भाजपने हे आयोजन केलंय, मात्र त्यांचा डाव यशस्वी होणार नाही. मुंबईत शिवसेनाच विजयी होईल, असं प्रत्युत्तर शिवसेनेतर्फे देण्यात आलंय. मुंबईच्या शहराध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेताच आशीष शेलार यांनी वरळीतील जांबोरी मैदानात दहिहंडी आयोजित केली आहे. शिवसेना या मैदानावर दरवर्षी दहिहंडी आयोजित करत असते. मात्र शिवसेनेची यंदाची दहिहंडी दुसऱ्या ठिकाणी होत आहे. त्याचं कारणही सुनील शिंदे यांनी स्पष्ट करून सांगितलं.

काय म्हणाले सुनील शिंदे?

भाजपच्या आव्हानाला उद्देशून सुनील शिंदे म्हणाले, ‘ कुणी कितीही उलथापालथ केली तरी वरळीतली शिवसेना एवढी प्रचंड अभेद्य आहे. कुणातीही डाळ शिजणार नाही. मी तिथे लहानपणापासून शिवसेनेचं काम करतोय. हे सगळं बोलण्याचा मला अधिकार आहे. वरळीतली दहिहंडी ही शिवसेनेने सुरु केलेली प्रथा आणि परंपरा आहे. ज्या मैदानावर ही मंडळी दहिहंडी घेत आहेत, आम्ही तिथे कार्यक्रम घेत नाहीत, कारण स्थानिक लोकांनी सांगितलं होतं की मैदानाचं सुशोभिकरण झालेलं आहे. मैदानाची निगा राखा, सांस्कृतिक कार्यक्रम तिथे घेऊ नका… असे म्हणाले. म्हणून आम्ही दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रम घेत आहोत. पण शिवसेनेचा तिकडचा गड मजबूत आहे. दहिहंडी आणि इतर गोष्टींचे कुणी स्वप्न पहात असतील तर ते स्वप्नच राहतील….

‘महापालिकेत 100% शिवसेनाच येणार’

भाजपने वरळीत दहिहंडीचं आयोजन केलंय, त्यामुळे आता ठाकरे कुटुंबच रडारवर असल्याचं बोललं जातंय. यावर उत्तर देताना सुनिल शिंदे म्हणाले, ‘ निवडणूक येऊ देत.. तेव्हा कोण गडगडतेय आणि कोण उभं राहतेय ते कळेल. महानगरपालिका ही शंभर टक्के शिवसेना जिंकणार आहे. मुंबई महापालिकेत विजयी होत असताना पुन्हा वरळीत शिवसेनेचे सगळेच नगरसेवक प्रचंड मतांनी निवडून येतील. वरळीमध्ये झालेली प्रचंड कामं असतील. वरळीत कामाच्या निमित्ताने चांगल्या हेतूने नकाशावर आली आहे. पण भाजपने अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात द्वेष असू शकतो. अशा टार्गेटला आम्ही महत्त्व देत नाहीत.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.