AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jayant Patil : भाजपाचे बेगडी हिंदूत्व, जयंत पाटलांनी सांगितले शिवसेना फोडण्यामागचे सर्वात मोठे कारण..!

गेल्या काही दिवसांपासून महापालिका निवडणूकांच्या तोंडावर भाजप-मनसेमध्ये युती होईल अशी चर्चा रंगलेली आहे. शिवाय त्या दृष्टीकोनातून हालचालीही सुरु आहेत. मात्र, हे दोन पक्ष एकत्र आले तर हिंदी भाषिकांच्या मतांचा प्रश्न उपस्थित होईल अशी एक भीती भाजपामध्ये आहे. तर दुसरीकडे मराठी मतदार हे उद्धव ठाकरेंबरोबर असल्याने त्यांचा वेगळा प्रश्न निर्माण होईल.

Jayant Patil : भाजपाचे बेगडी हिंदूत्व, जयंत पाटलांनी सांगितले शिवसेना फोडण्यामागचे सर्वात मोठे कारण..!
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसImage Credit source: TV9
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Aug 30, 2022 | 6:43 PM
Share

नागपूर :  (Shiv Sena) शिवसेनेत बंड होऊन आता दोन महिन्यांपेक्षा अधिकचा काळ उलटला आहे. यामागचे कारण वेगवेगळ्या पद्धतीने समोर आलेही आहे. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (Jayant Patil) जयंत पाटील यांनी यामागे नेमके काय कारण याबाबत मोठे विधान केले आहे. शिवसेना आणि भाजपात हिंदूत्ववादी मतांची दुफळी निर्माण होते म्हणूनच भाजपाने हा डाव साधला आहे. त्यामुळे त्यांना हिंदूत्वाशी घेणे-देणे नाहीतर मतांच्या गोळाबेरजेसाठी केलेला कयास असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. शिवाय (BJP Party) भाजपाचे हिंदूत्व हे बेगडी आहे. एक दिवस ते सर्वांसमोर येईलच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. आगामी निवडणूकांच्या अनुशंगाने जयंत पाटील हे विदर्भात पक्ष संघटनेच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी भाजपावर सडकून टीका तर केलीच पण मनसे आणि भाजप एकत्र आल्यावर काय? याची भविष्यावाणीही केली आहे.

भाजप- मनसे एकत्र आले तर..!

गेल्या काही दिवसांपासून महापालिका निवडणूकांच्या तोंडावर भाजप-मनसेमध्ये युती होईल अशी चर्चा रंगलेली आहे. शिवाय त्या दृष्टीकोनातून हालचालीही सुरु आहेत. मात्र, हे दोन पक्ष एकत्र आले तर हिंदी भाषिकांच्या मतांचा प्रश्न उपस्थित होईल अशी एक भीती भाजपामध्ये आहे. तर दुसरीकडे मराठी मतदार हे उद्धव ठाकरेंबरोबर असल्याने त्यांचा वेगळा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे मनसे आणि भाजपा ही युती होण्यापूर्वी अनेक बाबींवर अभ्यास केला जाईल. पण हे एकत्र येतील की नाही याबाबतही अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या निर्णयाबाबत आपण बोलणे उचित नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

मतांचे विभाजन म्हणून भाजपाचा हा डाव

हिंदूत्व हा केवळ एक मुद्दा आहे, त्यामागून राजकारण हेच भाजपाचा खरा उद्देश असल्याचे जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. हिंदूत्ववादी मतांची दुफळी पडते म्हणून शिवसेना फोडण्याचे काम भाजपाकडून झाले आहे. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी हा पक्ष कोणत्या स्थराला जाईल हे सबंध देशातील जनतेने पाहिलेले आहे. त्यामुळे हिंदूत्वाच्या मुद्द्यावरुन नाहीतर मतांच्या राजकारणासाठी शिवसेना फोडल्याचा घणाघात पाटील यांनी केला आहे.

सदस्य वाढीवर भर

आगामी काळात महापालिकेबरोबर इतर निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष हे संघटनात्मक वाढीवर भर देत आहेत. पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि सदस्य नोंदणीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नागपूर दौऱ्यावर आहेत. या निवडणूका ह्या पक्ष संघटनेत होणार आहेत. त्यामुळे सदस्य नोंदणीवर भर दिला जात आहे. त्याच अनुशंगाने जयंत पाटील हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. नागपुरात राष्ट्रवादीची कार्यकरणी बैठक पार पडल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Follow Us
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान