Dhananjay Munde : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपाचे ‘मिशन फेल’ राहणार, लोकसभा निवडणुकांवरून धनंजय मुंडेंची भविष्यवाणी काय?

निवडणूकांपूर्वी भाजपाकडून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील वातावरण बदलून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, ज्या विभागात गेल्या 20 ते 25 वर्षापासून राष्ट्रवादी कॉंग्रसने जनतेची सेवा केली आहे, त्या बालेकिल्ल्यात बदल हा सहज शक्य राहणार नाही. बारामती, पुणे, पिंपरी चिंचवड या ठिकाणी तर भाजपाच्या कित्येक पिढ्या गेल्या तरी त्यांना अपेक्षित बदल होणार नाही.

Dhananjay Munde : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपाचे 'मिशन फेल' राहणार, लोकसभा निवडणुकांवरून धनंजय मुंडेंची भविष्यवाणी काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 3:16 PM

पुणे : ‘मिशन लोकसभा’ (BJP Party) भाजपाच्या या घोषणेनंतर निवडणुकांना आवधी असतानाही राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. (Amit Shah) केंद्रीय अमित शाह यांनी मुंबई महापालिकेबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या असल्या तरी त्याचा परिणाम लोकसभा निवडणूकांवरही दिसू लागलाय. विशेषत: भाजपाने लक्ष केंद्रित केले आहेत ते बारामती या लोकसभा मतदार संघावर. मात्र, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात केंद्रीय मंत्री काय आणखी कोणी आले तर त्याचा फरक थेट मतदानावर होणार नसल्याचा विश्वास (Dhananjay Munde) माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. शिवाय राज्य सरकार हेच अल्पावधीसाठीच आहे. नियम डावलून सत्तेत बसलेले हे सरकार अधिक काळ टिकणार नसल्याचेही धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

हा आहे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला..!

निवडणूकांपूर्वी भाजपाकडून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील वातावरण बदलून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, ज्या विभागात गेल्या 20 ते 25 वर्षापासून राष्ट्रवादी कॉंग्रसने जनतेची सेवा केली आहे, त्या बालेकिल्ल्यात बदल हा सहज शक्य राहणार नाही. बारामती, पुणे, पिंपरी चिंचवड या ठिकाणी तर भाजपाच्या कित्येक पिढ्या गेल्या तरी त्यांना अपेक्षित बदल होणार नाही. कारण या मतदारसंघात झालेली कामे बोलत आहेत. बारामती मतदार संघामध्ये यापूर्वीच भाजपाचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्याचा विसर त्यांना पडला असेल असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.

केंद्रीय मंत्री राज्यातील लोकसभा मतदार संघात

आगामी लोकसभा निवडणूकांच्या अनुशंगाने 9 केंद्रीय मंत्री हे राज्यातील प्रमुख लोकसभा मतदार संघात येत आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण तर बारामती लोकसभा मतदार संघात येऊन पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम करणार आहेत. केंद्रीय मंत्री बारामती मतदार संघात दाखल होतील आणि येथील विकास कामे पाहून परतील असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

शिंदे सरकार थोड्या दिवसांचेच..!

राज्यात शिंदे आणि फडवणीस सरकार हे विश्वासघाताने आलेले आहे. त्यामुळे हे सरकार अधिकच्या काळाचे नसून लवकरच याबाबत सुनावणी होईल. जनतेची दिशाभूल आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खूपसून हे सरकार सत्तेवर आले आहे. शिवाय हे सत्य जनतेपासून लपून राहिलेले नाही. त्यामुळे अवघ्या काही दिवसांमध्ये हे सरकार कोसळेल असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलाय. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या घरी गणरायाच्या आरतीला आले.

शपथविधी अन् नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या बदलल्या, आता...
शपथविधी अन् नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या बदलल्या, आता....
शपथविधी होताच CM फडणवीसांसह DCM अजितदादा अन् शिंदे थेट मंत्रालयात
शपथविधी होताच CM फडणवीसांसह DCM अजितदादा अन् शिंदे थेट मंत्रालयात.
CM होताच ठाकरेंचा फडणवीसांना इशारा,'...असं जाणवलं तर जाणीव करून देणार'
CM होताच ठाकरेंचा फडणवीसांना इशारा,'...असं जाणवलं तर जाणीव करून देणार'.
गुलाबी जॅकेट, वेगळ्या पद्धतीने दादांनी घेतली सहाव्यांदा DCM पदाची शपथ
गुलाबी जॅकेट, वेगळ्या पद्धतीने दादांनी घेतली सहाव्यांदा DCM पदाची शपथ.
बाळासाहेब ठाकरेंच स्मरण अन् एकनाथ शिंदें घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
बाळासाहेब ठाकरेंच स्मरण अन् एकनाथ शिंदें घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ.
आतापासून राज्यात ‘देवेंद्र’पर्व, फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
आतापासून राज्यात ‘देवेंद्र’पर्व, फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ.
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह 'या' नेत्यांची हजेरी
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह 'या' नेत्यांची हजेरी.
'पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने...,'पतीचे कौतूक करताना अमृता म्हणाल्या
'पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने...,'पतीचे कौतूक करताना अमृता म्हणाल्या.
'शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,' काय म्हणाले अंबादास दानवे
'शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,' काय म्हणाले अंबादास दानवे.
'साहेब जो निर्णय घेणार असतील त्यामागे आम्ही..., 'काय म्हणाले सामंत
'साहेब जो निर्णय घेणार असतील त्यामागे आम्ही..., 'काय म्हणाले सामंत.