BMC election 2022 Ward No 31 R/South : भाजप गड कायम राखणार कि शिवसेना पत्ता कट करणार? वाचा वार्ड क्रमांक 31 मध्ये कोण मारणार बाजी ?

कमलेश यादव हे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. तसेच त्यांचा या मतदारसंघात मोठा दबदबा आहे. त्यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर भाजप पुन्हा हा आपला गड कायम राखायची तयारी करणार आहे. शिवसेना आणि भाजप दोन्ही मोठ्या ताकदीने रिंगणात उतरणार असल्यामुळे इथली लढत रंगतदार असेल.

BMC election 2022 Ward No 31 R/South : भाजप गड कायम राखणार कि शिवसेना पत्ता कट करणार? वाचा वार्ड क्रमांक 31 मध्ये कोण मारणार बाजी ?
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 12:21 AM

मुंबई : यंदाच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकी (BMC Election)त शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP)मध्ये कडवी लढत होण्याची शक्यता आहे. सध्या महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मात्र काही प्रभागांमध्ये जेथे भाजपचे नगरसेवक आहेत, तेथे शिवसेना दिग्गज उमेदवार रिंगणात उतरवरुन भाजपचा संबंधित प्रभागामधूनही पत्ता कट करण्याची शक्यता आहे. वॉर्ड क्रमांक 31 मध्ये अशाच प्रकारचे चित्र दिसण्याची चिन्हे आहेत. सध्या या वॉर्डमध्ये भाजपचे कमलेश यादव हे नगरसेवक आहेत. कमलेश यादव हे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. तसेच त्यांचा या मतदारसंघात मोठा दबदबा आहे. त्यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर भाजप पुन्हा हा आपला गड कायम राखायची तयारी करणार आहे. शिवसेना आणि भाजप दोन्ही मोठ्या ताकदीने रिंगणात उतरणार असल्यामुळे इथली लढत रंगतदार असेल.

‘मराठी कार्ड’बरोबर विकासकामांवर होणार फैसला

नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड क्रमांक 31 मध्ये मालाडमधील कमलानगर, बालभारती कॉलेज परिसर, शंकर लेन या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. या परिसरात मराठी मतदारांबरोबरच बिगरमराठी मतदारांचा टक्का अधिक आहे. त्यामुळे येथे मराठी कार्ड खेळण्याबाबरच इतर मुद्देही महत्वपूर्ण ठरणार आहेत. सध्याचे भाजपचे कमलेश यादव हे मराठी आणि बिगरमराठी मतदारांमध्ये तितकेच लोकप्रिय आहेत. त्यांनी केलेल्या विकासकामांचा भाजप लाभ उठवू शकते. त्याचवेळी शिवसेना या वॉर्डातील अनेक नागरी समस्यांवर बोट ठेवून भाजपला शह देऊ शकते.

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेनानिधी प्रमोद शिंदे 4,485 मतं
भाजपरुक्मिणी विठ्ठल खरटमोल3,256 मतं
काँग्रेसउषा अनिल कांबळे 1,333 मतं
राष्ट्रवादीरेशा मधुकर शिससाट1,716 मतं
मनसेशोभा अशोक शानभाग1,009 मतं
अपक्ष/ इतर

अरुंद रस्ते, कचरा, वाहतूक कोंडीचा प्रश्न ‘जैसे थे’

या वॉर्डमध्ये रस्त्यांचा प्रश्न प्रमुख मुद्दा आहे. अनेक भागांत अरुंद रस्ते आहे. त्यात काही ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्याचबरोबर रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांचेही आव्हान आहे. त्यातून होणारी वाहतूक कोंडीही नित्याची डोकेदुखी आहे. तसेच कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, जागोजागी फेकला जाणारा कचरा अशा विविध समस्यांतून सुटका व्हावी, अशी इथल्या मतदारांची अपेक्षा आहे.

हे सुद्धा वाचा

काँग्रेस, मनसेची भूमिका निर्णायक ठरणार

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये निवडणुकीत या वॉर्डमध्ये भाजपचे कमलेश यादव (Kamlesh Yadav) यांनी बाजी मारली होती. त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या (Congress) उमेदवार डॉ. गीता आशिष यादव (Gita Yadav) यांचा पराभव केला होता. कमलेश यादव यांना 7826 मते मिळाली होती, तर दुसऱ्या क्रमांकावरील डॉ. गीता यादव यांना 3973 मते मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकावरील मनसेचे उमेदवार दिनेश साळवी यांनाही तीन हजारांच्यावर अर्थात 3163 मते मिळाली होती. तसेच समाजवादी पार्टीच्या कैलास यादव यांना अडीच हजारांवर मतदारांनी पसंती दिली होती. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकमेकांशी भिडताना राष्ट्रीय काँग्रेस आणि मनसेची मते निर्णायक ठरणार आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.
'दिवार'मधील 'तो' डायलॉग म्हणत चतुर्वेदींकडून शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल
'दिवार'मधील 'तो' डायलॉग म्हणत चतुर्वेदींकडून शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल.
कॅमेरा सोमय्या शायनिंग.., होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेते भिडले
कॅमेरा सोमय्या शायनिंग.., होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेते भिडले.
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?.