Vidhan Parishad Election : विधान परिषदेसाठी भाजपची 7 नावं चर्चेत, पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, राम शिंदे, यांच्यासह कुणाची लॉटरी लागणार?

पंकजा मुंडे, हर्षवर्षन पाटील, माजी मंत्री राम शिंदे अशा मोठ्या नवांची चर्चा आहे. तसेच इतरही काहीजण रेसमध्ये आहेत. आता यात भाजपकडून कुणाची लॉटरी लागणार आणि कुणाची निराशा होणार हे चित्र लवकरच स्पष्ट होणार असं दिसतंय.

Vidhan Parishad Election : विधान परिषदेसाठी भाजपची 7 नावं चर्चेत, पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, राम शिंदे, यांच्यासह कुणाची लॉटरी लागणार?
विधान परिषदेसाठी भाजपची 7 नावं चर्चेत, पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, राम शिंदे, यांच्यासह कुणाची लॉटरी लागणार?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 7:57 PM

मुंबई : राज्यात सध्या राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) निवडणुकीबरोबरच विधान परिषेदेच्या निवडणुकीनेही (Vidhan Parishad Election) जोर धरला आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यात सध्या भाजपकडून 7 जणांची नावं चर्चेत आहेत. त्यात पंकजा मुंडे (Pankaja Munde), हर्षवर्षन पाटील, माजी मंत्री राम शिंदे अशा मोठ्या नवांची चर्चा आहे. तसेच इतरही काहीजण रेसमध्ये आहेत. आता यात भाजपकडून कुणाची लॉटरी लागणार आणि कुणाची निराशा होणार हे चित्र लवकरच स्पष्ट होणार असं दिसतंय. गेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे यांच्याविरोधात पराभव पत्करावा लागला होता. मात्र आता त्याचं नाव आघाडीवर आहे. तसेच हे सर्व वरीष्ठ पातळीवर ठरेल, मात्र पंकजा मुंडे यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असे विधान काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच या तीन बड्याा नेत्यांसोबत इतरही काही मोठी नावं चर्चेत आहेत.

भाजपकडून चर्चेतली नावं

  1. पंकजा मुंडे-फडणवीसांच्या मंत्री मंडळात मंत्री होत्या, मात्र गेल्या विधानसभेला धनजंय मुंडे यांच्याविरोधात परळीतून पराभव झाला.
  2. हर्षवर्धन पाटील– गेल्या निवडणुकीत काँग्रेसमधून भाजपात गेले, मात्र इंदापुरातून दत्ता भरणे यांच्याविरोधात पराभव पत्करावा लागला.
  3. राम शिंदे– फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, मात्र गेल्या विधानसभेत कर्जत-जामखेडमधून रोहित पवारांविरोधात पराभव झाला.
  4. प्रवीण दरेकर– सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. भाजपमधील आक्रमक चेहरा अशी ओळख.
  5. प्रसाद लाड– भाजपमधील आक्रमक चेहरा, त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महत्वाची जबाबदारी लाड यांच्यावर आहे.
  6. चित्रा वाघ– गेल्या विधानसभेवेळी राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष झाल्या.
  7. गोपाल आग्रावाल– काही दिवसांत मुंबई महापालिकांच्या निवडणुका लागत आहेत, त्यामुळे आग्रवालांना उमेदवारी दिल्याने समतोल राहू शकतो.

भाजपकडून किती जण निवडून जाणार?

भाजपकडील सध्याच्या आकडेवारीचा विचार केल्यास भाजपकडून चार जणांना आरामात विधान परिषदेवर संधी मिळू शकते. मात्र पाच जणांना विधान परिषदेवर पाठवण्याचा भाजपचा प्रयत्न हा नक्की राहणार आहे. त्यामुळे हे पाच जण कोण असणार? हेही चित्र लवकच स्पष्ट होईल.

कार्यकाळ संपणाऱ्या संदस्यांमध्येही मोठी नावं

आता ज्यांचा कार्यकाळ संपत आहे, अशा सदस्यांमध्येही अनेक मोठी नावं आहे. यात भाजपकडून विरोधकांशी सतत लढणारा चेहरा म्हणून सदाभाऊ खोत सतत मैदानात असतात. त्यांचा कार्यकाळ संपला आहे. तसेच इतर पक्षातीलही काही मोठी नावं आहेत. जसे की राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.