AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरनाईक यांच्या रिसॉर्टसाठी तामलवाडीत दुकानदारांवर बुलडोझर, हाच का तुमचा न्याय, काँग्रेसच आरोप..

काँग्रेसच्या आरोपांनुसार मंत्री सरनाईक यांनी हायवेला टच असलेली १९ एकर जमीन रिसॉर्ट बांधण्यासाठी घेतली आहे. जमीन खरेदीनंतर त्या भागातील अतिक्रमित दुकानं, हॉटेल आणि सरकारी शौचालयांवर देखील बुलडोजर चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सरनाईक यांच्या रिसॉर्टसाठी तामलवाडीत दुकानदारांवर बुलडोझर, हाच का तुमचा न्याय, काँग्रेसच आरोप..
Pratap Sarnaik
| Updated on: Aug 18, 2026 | 6:30 PM
Share

धाराशीवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तुळजापूर रोडवर घेतलेली १९ एकर जमीन वादात सापडली आहे.हायवेला टच असलेली १९ एकर जमीन रिसॉर्ट बांधण्यासाठी घेतली आहे. जमीन खरेदीनंतर त्या भागातील अतिक्रमित दुकानं, हॉटेल आणि सरकारी शौचालयांवर देखील बुलडोजर चालवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत असा आरोप काँग्रेसने केला आहे. स्वतः च्या रिसॉर्टचा रस्ता मोकळा करण्यासाठी गरीबांच्या पोटावर पाय हाच का तुमचा सोयीस्कर बुलडोझर न्याय असा सवाल काँग्रेसने केला आहे.

माहितीनुसार पालक मंत्री सरनाईक यांच्या कथित नव्या रिसॉर्टसाठी अडथळा नको म्हणून त्या भागातील अतिक्रमित कामे पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर मंत्र्‍यांच्या रिसॉर्टसाठी अतिक्रमण निघत असेल तर मग तुळजापूर आणि धाराशीव शहरातली अतिक्रमणे का नाही असाही प्रश्न केला जात आहे. ही जमीन आपण शेतीसाठी घेतल्याचा दावा पालक मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे.

प्रताप सरनाईक यांचा ‘विकास’ नेमका कुणासाठी?

धाराशीवमधील तामलवाडी टोलनाक्याजवळ दुकाने, हॉटेल आणि सार्वजनिक शौचालयांवर बुलडोझर चालवण्याचे आदेश… आणि याच परिसरात पालकमंत्र्यांची जवळपास २० एकर हायवे-टच जमीन आणि रिसॉर्टचे काम सुरू आहे! गरीबांचा रोजगार उद्ध्वस्त करून, शेतकऱ्यांच्या जमिनींवर बुलडोझर चालवून नेमका कुणाचा मार्ग मोकळा केला जातोय? अतिक्रमण हटवण्यासाठी तामलवाडीचाच एवढा ‘विशेष’ आग्रह का?  स्वतः च्या रिसॉर्टचा रस्ता मोकळा करण्यासाठी गरीबांच्या पोटावर पाय हाच का सोयीस्कर बुलडोझर न्याय आहे का असा सवाल काँग्रेसने समाजमाध्यमावर केला आहे.

मित्र पक्षाकडून आरोप…

मविआ सरकार असताना भाजपाच्या किरीट सोमय्या यांनी सरनाईक यांच्यावरच जमीन खरेदीवरुन गंभीर आरोप केले होते. ते सरनाईक आता भाजपसोबत सत्तेत असले तरी जमीन खरेदीवरुन त्यांच्यावर होणारे आरोप थांबलेले नाहीत. विशेष म्हणजे सरनाईक महायुतीत सत्तेत भाजपासोबत असले तरी भाजपाचेच आमदार नरेंद्र मेहता यांनीही मीरा-भाईंदरमधल्या सरनाईक यांच्या रिसॉर्टवरही आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांनुसार एकीकडे महाराष्ट्र खड्ड्यात असताना सरनाईक यांनी महापालिकेचे ५० कोटी खर्च करुन फक्त त्यांच्या रिसॉर्डकडे जाणारा रस्ता बांधल्याचा आरोपही केला आहे.

Follow Us
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल... नेमकं काय घडणार?
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी