रावणाच्या लंकेत बुरखाबंदी, रामाच्या देशात कधी? शिवसेनेचा सवाल

रावणाच्या लंकेत बुरखाबंदी, रामाच्या देशात कधी? शिवसेनेचा सवाल

मुंबई: साखळी बॉम्बस्फोटाने हादरलेल्या श्रीलंकेने बुरखाबंदी केली आहे. त्यावरुन शिवसेनेने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला. बुरखाबंदीवरुन शिवसेनेने सामनातून पंतप्रधान मोदींना थेट प्रश्न विचारला आहे. रावणाच्या लंकेत घडले; रामाच्या अयोध्येत कधी घडणार? असा सवाल सामनात उपस्थित करण्यात आला आहे.

VIDEO : श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटाचा महाभयंकर व्हिडीओ समोर

श्रीलंकेत 21 एप्रिलला रविवारी ईस्टरच्या दिवशीच झालेल्या साखळी स्फोटात आतापर्यंत 350 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास 500 जण जखमी आहेत.  या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकन सरकारने बुरखा, फेस मास्कसारख्या वस्त्रांना बंदी घातली आहे. चेहरा झाकणार्‍या व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे श्रीलंकेने जाहीर केलं आहे.

यावरुन शिवसेनेने मोदी सरकारला प्रश्न विचारला आहे. जे धाडस श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी दाखवलं, ते धैर्य तुम्ही कधी दाखवणार? रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? पंतप्रधान मोदी आज अयोध्येला निघाले आहेत, म्हणूनच हा प्रश्न आहे, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

 सामना अग्रलेखात काय म्हटलं आहे?

“लिट्टेच्या दहशतवादातून मुक्त झालेला हा देश आता इस्लामी दहशतवादाचा बळी ठरला. हिंदुस्थान, विशेषतः हिंदुस्थानचा जम्मू आणि कश्मीर प्रांत त्याच इस्लामी दहशतवादाने त्रस्त आणि जर्जर झाला आहे. प्रश्न इतकाच आहे की, श्रीलंका, फ्रान्स, न्यूझीलंड आणि ब्रिटनसारखी राष्ट्रे जी कठोर पावले उचलतात तशी पावले आपण कधी उचलणार? विद्यमान सरकारने ‘ट्रिपल तलाक’विरोधात कायदा करून पीडित मुस्लिम महिलांचे शोषण वगैरे थांबवले हे मान्य, पण भीषण बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत बुरखा आणि नकाबसह चेहरा झाकणार्‍या प्रत्येक गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी जाहीर केले. आम्ही या निर्णयाचे स्वागत करीत आहोत व पंतप्रधान मोदी यांनीही श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून हिंदुस्थानातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी, अशी मागणी राष्ट्रहितासाठी करीत आहोत”.

संबंधित बातम्या 

दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकेत बुरख्यावर बंदी घालण्याची शक्यता  

श्रीलंका बॉम्बस्फोट चौकशीदरम्यान महिलेने स्वतःसह मुलांना बॉम्बने उडवले    

VIDEO : श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटाचा महाभयंकर व्हिडीओ समोर  

श्रीलंका बॉम्बस्फोटात डेन्मार्कच्या सर्वात श्रीमंत उद्योगपतीच्या 3 मुलांचा मृत्यू  

Published On - 10:53 am, Wed, 1 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI