मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी! मोतीलाल नगर पुनर्विकास खासगी विकासकाला देण्यास देसाईंचा विरोध?

गोरेगावमधील मोतीलाल नगर येथील म्हाडा वसाहतींचा विशेष बाब म्हणून पुनर्विकास करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयावरुन आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाल्याची माहिती मिळतेय. मोतीलाल नगर पुनर्विकास खासगी विकासकाला देण्यास शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा विरोध होता, असं कळतंय.

मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी! मोतीलाल नगर पुनर्विकास खासगी विकासकाला देण्यास देसाईंचा विरोध?
सुभाष देसाई, उद्योग मंत्री


मुंबई : गोरेगावमधील मोतीलाल नगर येथील म्हाडा वसाहतींचा विशेष बाब म्हणून पुनर्विकास करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास केल्यावर पुनर्वसन घटकाव्यतिरिक्त साधारणपणे 33,000 गाळे सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होवू शकतील. त्यामुळे यास “विशेष प्रकल्पाचा दर्जा” देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या निर्णयावरुन आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाल्याची माहिती मिळतेय. मोतीलाल नगर पुनर्विकास खासगी विकासकाला देण्यास शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा विरोध होता, असं कळतंय. (Dispute in cabinet meeting over Motilal Nagar redevelopment project)

गोरेगावमधील मोतीलाल नगर पुनर्विकासाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी उडाल्याची माहिती मिळतेय. म्हाडा असताना खासगी विकास का? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. आधीच पत्रा चाळ प्रकल्प रखडला आहे. त्यात या प्रकल्पाची भर नको अशी भूमिका उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मांडल्याची माहिती मिळतेय. तरीही मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प खासगी विकासकाला देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आला आहे.

प्रकल्पासाठी राष्ट्रवादीचा दबाव?

महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे हा प्रकल्प मंजूर झाल्याची चर्चा आहे. मोतीलाल नगर हा मुंबईतील आतापर्यंतचा मुंबईतील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प आहे. बीडीडी चाळीपेक्षाही मोठा हा प्रकल्प असणार आहे. म्हाडाला हा प्रकल्प राबविने शक्य नसल्यामुळे खासगी कंपनीच्या हाती हा प्रकल्प दिला जाणार आहे. या पुनविकास प्रकल्पासाठी कॉन्ट्रॅक्ट्स आणि डेव्हलपमेंट एजन्सी नेमणूक केली जाणार आहे.

मोतीलाल नगरात पुनर्विकासास मुबलक जागा उपलब्ध

म्हाडाच्या गोरेगाव (प.) येथील मोतीलाल नगर 1, 2 व 3 येथे सुमारे 50 हेक्टर ऐवढ्या जागेवर गाळ्यांची अंदाजीत संख्या 3700 व झोपड्यांची संख्या अंदाजे 1600 अशी एकत्रित 5300 इतकी आहे. मोतीलाल नगर वसलेल्या जागेचे एकूण क्षेत्रफळ लक्षात घेता, गाळ्यांची घनता 106 गाळे प्रति हेक्टर आहे. ही घनता बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034 च्या विनियम 30 (बी) नुसार 450 गाळे प्रति हेक्टरपेक्षा फारच कमी आहे. त्यामुळे प्रत्यक्षात तेथे पुनर्विकासास मुबलक जागा उपलब्ध आहे. शिवाय, सध्या तेथे अस्तित्वात असलेल्या रहिवाशांना त्यांनी धारण केलेल्या गाळ्यांच्या क्षेत्रफळापेक्षा मुबलक मोकळी जागा वापरण्यास उपलब्ध आहे, या सर्व गोष्टींवर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

प्रकल्पास  विशेष प्रकल्पाचा दर्जा  देण्याचा निर्णय

गोरेगावमधील म्हाडा वसाहतींचा विशेष बाब म्हणून पुनर्विकास करण्यासाठी अधिकचे बांधकाम क्षेत्रफळ मंजूर करावयाचे असल्याने, तसेच हा पुनर्विकास प्रकल्प कंन्स्ट्रक्शन अॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सी ची नेमणूक करून करावयाचा असल्याने या प्रकल्पास  विशेष प्रकल्पाचा दर्जा  देण्याचा निर्णय झाला.

ही नेमणूक करताना चटई क्षेत्र निर्देशांकाची हिस्सा विभागणी तत्वानुसार करण्यात यावी व त्यासाठी आवश्यक ती निविदा प्रक्रिया म्हाडामार्फत राबविण्यात येईल. या प्रकल्पासाठी निविदा अंतिम करताना पुनर्वसन हिस्सा वगळून उर्वरित शिल्लक चटई क्षेत्रफळापैकी जास्तीत जास्त हिस्सा म्हाडास उपलब्ध करुन देणाऱ्या एजन्सीची निविदा अंतिम करण्यात येईल. मात्र, निविदेतील देकारानुसार म्हाडास मिळणारे बांधिव क्षेत्रामध्ये सवलत देणे अथवा त्याऐवजी अधिमूल्याचा पर्याय स्वीकारला असल्यास अधिमूल्यामध्ये सवलत देण्याबाबत नेमकी स्थिती याबाबत निविदा अंतिम करण्यापूर्वी शासनाची पूर्वमान्यता घेण्यात येईल.

इतर बातम्या :

‘महानिर्मिती’ राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

भाजप खासदार सुभाष भामरेंना चिकनगुनियाची लागण, उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल

Dispute in cabinet meeting over Motilal Nagar redevelopment project

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI