AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांची ताकद असती तर फडणवीसांचं सरकार टिकलं असतं : चंद्रकांत पाटील

अजित पवारांची ताकद असती तर फडणवीसांचं सरकार टिकलं असतं, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला.

अजित पवारांची ताकद असती तर फडणवीसांचं सरकार टिकलं असतं : चंद्रकांत पाटील
ajit pawar chandrakant patil
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Dec 17, 2020 | 7:36 PM
Share

अहमदनगर :  अजित पवारांची ताकद असती तर फडणवीसांचं सरकार टिकलं असतं, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला. चंद्रकांत पाटील साईबाबाच्या दर्शनासाठी आले असता त्यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. (BJP Chandraaknt patil Slam DCM Ajit pawar)

“अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर 80 तासांचे सरकार आले त्यावेळी त्यांनी आणलेले आमदार टिकवता आले असते. त्यांच्या आमदारांना त्यांनी सांभाळलं असतं तर सरकार टिकले असते”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“भाजपमधले काही आमदार नाराज आहेत, असं अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या दाव्यावर तुमचं आघाडी सरकार उत्तम चाललंय, आमच्या लोकांना कशाला आकर्षित करता?, असं पाटील म्हणाले. अजितदादा खूप ‌चांगले नेते आहेत. चांगलं काम करतात. गंमत निर्माण होईल अस बोललं तर त्यांची प्रतिष्ठा कमी होईल”, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

“भाजपचे आमदार नाराज असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसंच राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत. तसंच राष्ट्रवादीत लवकरच मोठी महाभरती होणार असल्याचा दावा ते करत आहेत. यावर तुम्ही सरकार चालवा आम्ही विरोधी पक्ष सांभाळू”, असं पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांना संजय राऊत यांच्यावरती पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, “कोण संजय राऊत?”, अशा शब्दात त्यांची खिल्ली उडवली. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि त्यांनी दिलेल्या घटनेतील चौकटींना मानायचे नाही. डॉ. आंबेडकरांच्या घटनेवर देशाचा कारभार उत्तम सुरु आहे आणि पुढेही सुरु राहील. हे सर्व तुम्हांला मान्य नाही का?”, असा सवाल त्यांनी संजय राऊत तसंच शिवसेनेला केला.

ग्रामपंचायत निवडणुकीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढले तर त्यांची ताकद जास्तच होणार. पण आम्हीही ग्रामपंचायत निवडणूका ताकदीने लढवणार. एक मात्र खरं निवडणूक असो वा निर्णय शिवसेना आपलं नुकसान करुन घेत आहे हे मात्र तितकंच खरं”

म”ला चंपा बोललं जात मात्र आम्ही त्यास‌ उत्तर देत नाही. मुख्यमंत्र्यांना उठा आणि शरद पवार यांना शपा असं म्हटलेलं चालेल का?  ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. निवडणूक संपल्यावर पाच वर्ष एकत्र काम करावं, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.  मात्र गेल्या वर्षात सरकार वाचवण्यासाठी विरोधकांना टार्गेट केलं जातंय. अशा पद्धतीने राग मनात धरुन सरकार चालत नाही”, असं पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या

शिवसेनेच्या पराभवाचीही भरपाई करू : जयंत पाटील

“थपडेवर थप्पड, थपडेवर थप्पड”, भातखळकरांनी सेनेला पुन्हा डिवचलं

Follow Us
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती