AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्यांची NIA चौकशी व्हावी, चंद्रकांत पाटील यांची मागणी

मुख्यमंत्री सरकारी रुग्णालयात उपचार घेत नाहीत याचा अर्थ राज्यातील सरकारी रुग्णालय सुस्थितीत नाहीत हे सिद्ध होतंय, असं चंद्रकात पाटील म्हणाले.

नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्यांची NIA चौकशी व्हावी, चंद्रकांत पाटील यांची मागणी
चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 1:25 PM
Share

कोल्हापूर: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विविध मुद्यांवरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. पेट्रोल डिझेलवरील कर कमी करणं. उद्धव ठाकरे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणं, नवाब मलिक यांच्यावर एनआयएच्या कारवाईची मागणी आदी मुद्यावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

नवाब मलिक यांना एनआयनं ताब्यात घ्यावं

चंद्रकात पाटील यांनी नवाब मलिक यांना राज्यातील कोणत्याही गावात फिरू देणार नाही, असं म्हटलंय.एनआयएनं नवाब मलिक यांना तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे.नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

ठाकरे सरकार पेट्रोल डिझेलवरील कर कधी कमी करणार?

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यानंतर महागाई विरोधात काँग्रेस नेत्यांकडून आंदोलन करण्यात आलं होतं. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार यांच्या नेतृत्त्वातील सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी कमी केलं आहे. त्यानंतर 11 भाजपशासित राज्यांनीदेखील कर कमी केले आहेत. फक्त भाजपशासित राज्यांनीच नाही तर काँग्रेसशासित राज्यांनी देखील इंधनावरील कर कमी केले आहेत. मात्र, ठाकरे सरकारनं कर कमी करण्याचा निर्णय घेतला नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

उद्धव ठाकरेंना सरकारी रुग्णालय का चालत नाही?

उद्धव ठाकरे यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालय का चालत नाही, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मुख्यमंत्री सरकारी रुग्णालयात उपचार घेत नाहीत याचा अर्थ राज्यातील सरकारी रुग्णालय सुस्थितीत नाहीत हे सिद्ध होतंय, असं चंद्रकात पाटील म्हणाले. मला वैयक्तिक टीका करायची नाही. पण, देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाल्यानंतर ते सरकारी रुग्णालयात दाखल झाले होते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

कारवाईला घाबरत नाही

नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक खान यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या कायदेशीर नोटिशीबद्दल विचारले असता आम्ही चळवळीतील कार्यकर्ते आहोत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. आम्ही कोणत्याही कारवाईला घाबरत नाही, असं पाटील म्हणाले.

संजय राऊत यांना बोर्नविटा पिण्याची गरज

दररोज सकाळी बोलून संजय राऊत दमले, आता नवाब मलिक बोलत आहेत.संजय राऊत आणि मलिक यांच्यामध्येच स्पर्धा सुरू झाली आहे… संजय राऊत यांना बोर्नविटा पिण्याची गरज आहे, असा टोला संजय राऊत आणि नवाब मालिक यांना चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

इतर बातम्या:

आधी अमृता यांच्याशी पंगा, आता देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस, मलिकांच्या लेकीने शड्डू ठोकला!

VIDEO: आत्महत्या करणाऱ्यांचं नेतृत्व करणार नाही, आधी आत्महत्या थांबवा; राज ठाकरेंचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

Chandrakant Patil demanded sedition case register on Nawab Malik and NIA detained him

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.