AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी अमृता यांच्याशी पंगा, आता देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस, मलिकांच्या लेकीने शड्डू ठोकला!

गेले अनेक दिवस ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या एकमेकांविरोधात आरोपांच्या फैरी सुरुच आहे. फडणवीसांनी आरोप करताना मलिकांच्या जायवाच्या घरी ड्रग्ज सापडल्याचा सनसनाटी आरोप केला. या सगळ्या प्रकाराने मलिक संतप्त आहेत.

आधी अमृता यांच्याशी पंगा, आता देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस, मलिकांच्या लेकीने शड्डू ठोकला!
देवेंद्र फडणवीस आणि निलोफर खान
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 2:28 PM
Share

मुंबई :  गेले अनेक दिवस ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या एकमेकांविरोधात आरोपांच्या फैरी सुरुच आहे. फडणवीसांनी आरोप करताना मलिकांच्या जायवाच्या घरी ड्रग्ज सापडल्याचा सनसनाटी आरोप केला. या सगळ्या प्रकाराने मलिक संतप्त आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी जे विधान केलं ते एका कुटुंबाची बदनामी होती, त्यांनी माफी मागावी, त्यांना माझ्या मुलीने (निलोफर खान) कायदेशीर नोटीस पाठवली आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. त्यामुळे मलिकांच्या लेकीवर आणि जावयावर टीका केल्याने फडणवीस अडचणीत येणार का? अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

मलिकांची लेक निलोफर यांची फडणवीसांना नोटीस

नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरी ड्रग्ज सापडलं, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यांच्या दाव्यानंतर फडणवीस विरुद्ध मलिक अशी लढाई सुरु झाली आहे. या लढाईत फडणवीसांनी मलिकांच्या जावयाचं नाव घेतलं. पण फडणवीसांच्या दाव्याचा उल्लेख पंचनाम्यात नाहीय. म्हणजेच मलिकांच्या जावयाच्या घरी ड्रग्ज सापडल्याचा उल्लेख पंचनाम्यात नाहीय. या सगळ्या प्रकरणानंतर नवाब मलिक यांची लेक निलोफर यांनी आक्रमक पवित्रा घेत फडणवीसांना थेट कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

आज सकाळी 10 वाजता घेतल्ल्या पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिक यांनी फडणवीसांनी विधाने मागे घ्यावेत अन्यथा मागी मागावी, अशी मागणी केली. तसंच माफी मागितली नाही तर नोटीस रेडी असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

तर मानहानीचा दावा दाखल करणार, मलिकांचा फडणवीसांना इशारा

देवेंद्र फडणवीस यांनी जे विधान केलं त्याने एका कुटुंबाची बदनामी झाली. त्यामुळेच माझ्या मुलीने फडणवीस यांना नोटीस पाठवली आहे. फडणवीस यांनी या प्रकरणी माफी मागितली नाही तर क्रिमिनल आणि सिव्हिल सूट फाईल आहे. प्रत्येकाला राईट टू स्पीक आहे. पण राईट टू अब्यूस नाही. मानहानी होत आहे. त्यामुळेच मुलीने नोटीस पाठवली असून त्यांनी माफी नाही मागितली तर मानहानीचा दावा करणार आहोत, असं मलिक यांनी सांगितलं.

अमृता फडणवीस-निलोफर खान यांच्यातही वाकयुद्ध

नवाब मलिक यांची ‘बिगडे नवाब’ अशी निर्भत्सना करणाऱ्या अमृता फडणवीस यांना मलिक यांची कन्या निलोफर मलिक-खान यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. सत्य तुमच्या बाजूने आहे तर घाबरता कशाला? असा सवालच निलोफर मलिक खान यांनी अमृता फडणवीस यांना विचारला.

अमृता फडणवीस यांना भिडणाऱ्या निलोफर यांनी आता देवेंद्र फडणवीसांनाही नोटीस पाठवली आहे. त्यामुळे फडणवीस पती पत्नीविरोधात निलोफर यांनी पंगा घेतल्याने फडणवीसांवर माफी मागण्याची वेळ येणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

हे ही वाचा :

गुजरातेतल्या द्वारकेत 350 कोटींचं ड्रग्ज पकडलं, आधी संजय राऊत, आता मलिकांनी भाजपला घेरलं?

अमृता फडणवीसांच्या बिगडे नवाबला निलोफर यांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, घाबरता कशाला?

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.