अशा भेटी होतच असतात, चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान

"राजकीय क्षेत्रात भिन्न विचारांचे भिन्न पक्षाचे लोक असे अधूनमधून भेटत असतात", असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं (Chandrakant Patil on Sanjay Raut Devendra Fadnavis meeting).

अशा भेटी होतच असतात, चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान

पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या गुप्त भेटीनंतर विविध चर्चांना उधाण आलं आहे. संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दोन तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “अशा भेटी होतच असतात”, असं सूचक विधान चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केलं (Chandrakant Patil on Sanjay Raut Devendra Fadnavis meeting).

“देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात अशी काही भेट झाल्याची माहिती नाही. किंबहुना आज संध्याकाळी कार्यकर्त्यांचा खूप मोठा वेबिनार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात दीड लाखांपेक्षाही जास्त लोक सहभागी झाले. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसही होते”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

“राजकीय क्षेत्रात भिन्न विचारांचे भिन्न पक्षाचे लोक असे अधूनमधून भेटत असतात. पण त्यातून काहीतरी बातमी निर्माण होईल, असं नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले (Chandrakant Patil on Sanjay Raut Devendra Fadnavis meeting).

“गेल्या नऊ महिन्यांमध्ये सरकार जाणार अशी चर्चा सुरु आहे. पण देवेंद्र फडणवीस, मी किंवा आमचे कुठलेच नेते हे सरकार पडेल, असं म्हणाले नाहीत. हे सरकार जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करत नाही. पण हे सरकार अंतर्गत विरोधांमुळे पडेल, असं सर्वसामान्य जनता म्हणत आहे. हे सरकार पडेल तेव्हा पडेल. पण आम्ही त्यात कोणतीही भूमिका बजावणार नाही”, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

प्रविण दरेकरांचंही सूचक वक्तव्य

दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीवर आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. “राजकारणात दोन अधिक दोन चार कधीच होत नाही. शिवसेना ज्या अर्थी काँग्रेससोबत युती करू शकते तर राजकारणात काहीही होऊ शकते”, असं सूचक विधान प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या :

संजय राऊत- देवेंद्र फडणवीस भेटीने आनंद : प्रवीण दरेकर

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI