AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता उद्धवजी देशाच्या राजकारणात जाणार म्हणता त्यासाठी फिरावं लागतं बाबा, चंद्रकांत पाटलांची शिवसेनेवर जहरी टीका

फलटण येथील भाजपच्या (BJP) कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्ला चढवत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलय.

आता उद्धवजी देशाच्या राजकारणात जाणार म्हणता त्यासाठी फिरावं लागतं बाबा, चंद्रकांत पाटलांची शिवसेनेवर जहरी टीका
चंद्रकांत पाटील
| Edited By: | Updated on: Dec 08, 2021 | 10:06 AM
Share

सातारा: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे काल सातारा जिल्ह्यातील फलटणच्या दौऱ्यावर होते. फलटण येथील भाजपच्या (BJP) कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्ला चढवत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलय. ज्यांनी आमच्या जीवावर अठरा खासदार निवडून आणलेत ते आता देशाच्या राजकारणात जायची स्वप्न बघत आहेत. देशाच्या राजकारणात जायचं असेल तर त्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं. गेल्या दोन वर्षात एकदाही मंत्रालयात न गेलेल्यांनी वेगवेगळ्या वल्गणा करु नयेत अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

शरद पवार नेहमीच पंतप्रधान होत असतात

संजय राऊत तर उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करायला निघालेत तर कधी शरद पवार पंतप्रधान होतील अशा गर्जाना करत आहेत. शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात, असा टोमणा सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी मारलाय. फलटण तालुका आणि शहराच्या संपर्क कार्यालयाच्या उदघाटनासाठी घेतलेल्या या सभेत त्यांनी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टीका केली. यावेळी भाजपाचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ,आमदार जयकुमार गोरे, अनुप शहा हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते

संजय राऊत डबल ढोलकी

संजय राऊत हे एक नंबरचे डबल ढोलकी असल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केलाय. शिवसेना खासदार संजय राऊत हे एक नंबरची डबल ढोलकी आहेत. ममता बनर्जी मुंबईमध्ये आल्या की त्यांच्या सुरात सुर मिसळतात. दिल्लीत गेले की राहुल गांधी यांच्या सुरात सुर मिसळतात, अशी टीका पाटील यांनी केलीय.

सत्ता टिकवण्यासाठी काहीही करायला तयार

सत्तेची खूर्ची टिकवण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात.ममता बनर्जी यांनी युपीए कुठं आहे असा प्रश्न विचारला होता त्यावेळी संजय राऊत त्यांच्या बाजूला होते. राहुल गांधी वर्षाचे सगळे दिवस परदेशात असतात, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यावर यावर काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीतून डोळे वटारले असतील त्यामुळे लगेच त्यांची समजुत घालायला संजय राऊत गेले असतील अशी जहरी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साता-यातील फलटण येथील कार्यक्रमात केली आहे. संजय राऊत यांनी काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीवरुनचं चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

इतर बातम्या:

प्राजक्त तनपुरे अनिल देशमुखांच्या वाटेनं जाणार, किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर राष्ट्रवादीचा नवा नेता

Ratnagiri Elections | रत्नागिरीतील नगरपंचायत निवडणुकीत उलथापालथ, शिवसेना राष्ट्रवादीची आघाडी, नव्या समीकरणांचा आमदार कदमांना फटका

Chandrakant Patil slam Uddhav Thackeray and Sharad Pawar at Phaltan BJP Office inauguration Programme

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.