AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं’, चंद्रकांत पाटलांचं भाषण वादात; दिल्लीवरुन आदेशानंतर भाजपची सारवासारव

पाटील यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गट नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावरुन काढण्याचे आदेश दिल्लीतून देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

'मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं', चंद्रकांत पाटलांचं भाषण वादात; दिल्लीवरुन आदेशानंतर भाजपची सारवासारव
Image Credit source: Google
| Edited By: sagar joshi | Updated on: Jul 23, 2022 | 4:03 PM
Share

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर अनपेक्षितपणे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. मात्र, यावरुन भाजपमध्ये खदखद आणि नाराजी असल्याचं दिसून येत आहे. मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलीय. पनवेलमध्ये भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. या बैठकीत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान पाटील यांच्या वक्तव्याचे पडसाद दिल्लीत उमटल्याचं पाहायला मिळतंय. पाटील यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गट नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावरुन काढण्याचे आदेश दिल्लीतून देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

‘केंद्रीय नेतृत्वाच्या या निर्णयानं आपल्या सर्वांनाच दु:ख झालं’

कार्यकारिणी बैठकीत बोलताना पाटील म्हणाले की, मागील अडीच वर्षात राज्यात काय परिस्थिती आहे हे सर्वांनीच पाहिलं. ही परिस्थिती पाहिल्यानंतर राज्यात सत्ता बदल होण्याची गरज होती. राज्यात सत्ता बदल झाला. तो बदल होत असताना योग्य संदेश देईल अशा व्यक्तीची गरज होती. असं असतानाही आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वानं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय नेतृत्वाच्या या निर्णयानं आपल्या सर्वांनाच दु:ख झालं. पण ते पचवून आपण पुढे गेलो’.

शिंदे गट नाराज होण्याची भीती, भाजपची सारवासारव

पाटील यांच्या वक्तव्यानंतर आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयावर प्रदेशाध्यक्षांची अशाप्रकारची प्रतिक्रिया भाजपमध्ये अपेक्षित नाही. तसंच पाटील यांच्या वक्तव्यानं शिंदे गट नाराज होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओ काढण्याचे आदेश केंद्रीय पातळीवरुन देण्यात आल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, पाटील यांच्या वक्तव्यानंतर आता भाजपकडून सावरासावर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. पाटील यांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता आमदार आशिष शेलार म्हणाले की पाटील यांनी तेव्हा असलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. तसंच पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओ बाहेर आलाच कसा? हा अंतर्गत विषय आहे, असं शेलार यांनी म्हटलंय.

Follow Us
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; नेमकं काय शिजतंय?
Eknath Shinde in Delhi : उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; विधानपरिषद निवडणुकीआधी महत्त्वाच्या भेटीगाठी, नेमकं काय शिजतंय?
भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ...
Vidhan Parishad Election : भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ, महायुतीत नेमकं काय सुरू?