मुंबई : ओबीसी आरक्षण अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली असली तरी जाहीर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुका पुढे ढकलण्यास निवडणूक आयोगाने असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात तातडीने जाऊन आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा. 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका आघाडी सरकारने थांबवा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी केली. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. (Chandrasekhar Bavankule criticizes Mahavikas Aghadi government over OBC reservation)