मुंबई : पुढील वर्षाच्या सुरुवातीला देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगूल वाजणार आहेत. 2022 मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाबह, गोवा आणि मणिपूर या राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. अशावेळी तृणमूल काँग्रेसनं मोठी घोषणा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. कारण, गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तृणमूल काँग्रेस उतरणार आहे. तशी घोषणाच आज टीएमसीचे नेते डेरेक ओब्रायन यांनी केलीय. (Trinamool Congress to contest Goa Assembly elections)