जालना : ‘मोदी सरकारने परदेशातून तेल आयात केल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळेनासा झाला आहे. मुळात भाजप नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात राहिला आहे, असा आरोप करतानाच याच मतदारसंघातील भाजप नेते रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांना ‘साले’ बोलले होते. त्यांचं हे विधान घराघरात पोचवा’, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं. एक वेळ असा होता की आपल्या पक्षात कोणी थांबत नव्हतं. लोकं पक्ष सोडून जात होते. आज मात्र त्यांना पश्चाताप होतोय की राष्ट्रवादीत थांबायला हवं होतं. आपण पडत्या काळात पक्षासोबत होतात आजही आहात याबद्दल भोकरदनवासियांना धन्यवाद दिले. (Jayant Patil criticizes Modi Government and Union Minister Raosaheb Danve in Jalna)