भाजपनेच ओबीसी, मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा मांडला; जयंत पाटलांचा आरोप

ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही राष्ट्रवादी पक्षाची भूमिका नेहमी राहिली आहे. केंद्रसरकारच्या भूमिकेमुळे ओबीसी लोकसंख्येला धक्का बसला आहे. (jayant patil attacks bjp over obc and maratha reservation)

भाजपनेच ओबीसी, मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा मांडला; जयंत पाटलांचा आरोप
जयंत पाटील, जलसंपदा मंत्री

जालना: ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही राष्ट्रवादी पक्षाची भूमिका नेहमी राहिली आहे. केंद्रसरकारच्या भूमिकेमुळे ओबीसी लोकसंख्येला धक्का बसला आहे. इम्पिरिकल डाटा देण्यास केंद्रसरकारने नकार दिला आहे. मात्र असे असतानाही राज्य सरकारने घेतलेल्या काही निर्णयामुळे ओबीसींच्या जागा सुरक्षित झाल्या हे आपल्या सरकारचे श्रेय आहे, असं सांगतानाच भाजपनेच ओबीसी व मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. (jayant patil attacks bjp over obc and maratha reservation)

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरू झाली आहे. आज या यात्रेचा दुसरा दिवस आहे. जालना शहर व ग्रामीण पदाधिकार्‍यांशी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी याठिकाणी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला आहे. कमिट्यांचे मेळावे घेणे. आरक्षणाविषयी आपले धोरण काय आहे हे समजून सांगणे, राज्यसरकारच्या धोरणाबाबत माहिती देणे अशी शिबीरे आता पुढे घेतली जाणार आहे, अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली. शरद पवार यांना या जिल्हयाकडून फार मोठया अपेक्षा आहेत. सत्ता येते – जाते त्यामुळे सत्ता टिकायची असेल तर संघटन फार महत्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

टोपेंचं तोंडभरून कौतुक

राजेश भैय्याने राज्यातील कोरोनाची साथ उत्तमरित्या हाताळली आहे. त्यामुळे त्यांचे नाव देशभरासह जगात नावाजले गेले हे जालनावासियांचे भाग्य आहे. आता कुठलीही लाट आली तरी त्याला तोंड देण्याची तयारी राजेशभैय्याने केली आहे, अशा शब्दात त्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे कौतुक केले. जशी असंघटित कामगारांसाठी धोरण आहे तसे धोरण माझ्या शेतमजूरांनाही हवे त्यासाठी एखादे महामंडळ काढता येते का याविषयी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

बदनापुरात घड्याळ निवडून आणा

बदनापूर विधानसभा मतदारसंघात 2024 ला राष्ट्रवादीचंच घड्याळ आणायचं याची खूणगाठ बांधा, असे त्यांनी केले. नवचैतन्य आणायचे असेल तर बुथ कमिट्यांचे मेळावे घ्या. पैसा हाच अंतिम विजय राजकारणात असतो असे नाही, असंही ते म्हणाले.

हतवन प्रकल्पाचे काम सुरू करणार

जिल्ह्यातील हातवन बृहत ल.पा प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करण्याचे व गलाटी मध्यम प्रकल्पातील गाळ काढून प्रकल्पाची साठवण क्षमता वाढवण्याबाबत उपाययोजना करण्याचे तसेच जिल्ह्यातील अकार्यान्वित असलेल्या योजनांमधील अडचणी दूर करून कार्यान्वित करण्याबाबत प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जालना हा मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा असून इथल्या लोकप्रतिनिधींनी जे प्रश्न मांडले त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले. जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्राची सिंचन क्षमता वाढविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. (jayant patil attacks bjp over obc and maratha reservation)

 

संबंधित बातम्या:

कोरोनोसेवेसाठी जागा वापरली म्हणून त्र्यंबकेश्वर देवस्थानने प्रशासनाकडे चक्क एक कोटी रुपये मागितले

‘युवकांच्या भविष्याशी खेळू नका, त्यांचे तिकीटाचे पैसे द्या’, रोहित पवारांचा घरचा आहेर

काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुकीत किती जागांवर लढणार?; भाई जगतापांनी सांगितला आकडा

(jayant patil attacks bjp over obc and maratha reservation)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI