काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुकीत किती जागांवर लढणार?; भाई जगतापांनी सांगितला आकडा

येत्या फेब्रुवारीत मुंबई महापालिकेची निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. त्यापार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. (Bhai Jagtap says party to go solo in BMC elections)

काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुकीत किती जागांवर लढणार?; भाई जगतापांनी सांगितला आकडा
bmc

मुंबई: येत्या फेब्रुवारीत मुंबई महापालिकेची निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. त्यापार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसनेही निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी तर काँग्रेस महापालिकेच्या सर्वच्या सर्व 227 जागांवर उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. (Bhai Jagtap says party to go solo in BMC elections)

भाई जगताप यांच्या उपस्थितीत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची जिल्हा स्तरीय बैठक आज संपन्न झाली. यावेळी मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अजंता यादव आणि पालकमंत्री अस्लम शेखही उपस्थित होते. यावेळी भाई जगताप यांनी महापालिका निवडणुकीचं गणित, निवडणुकीचा आराखडा समजावून सांगितला. तसेच मुंबई जिंकण्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांनी काय केले पाहिजे याच्या सूचनाही दिल्या. यावेळी त्यांनी आम्ही 227 जागा लढण्यावर ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

महापालिका लागली कामाला

दरम्यान, मुंबई महापालिका लागली निवडणुकीच्या कामाला लागली आहे. मुंबईतील प्रत्येक वॉर्डात वस्ती, झोपडपट्टी, इमारती याचा आढावा घेण्याचे प्रत्येक सहाय्यक आयुक्तांना आयुक्तांनी आदेश दिले आहेत. महापालिका 227 वॉर्डांचा कच्चा आराखडा तयार करणार आहे. तसेच निवडणूक आयोगाने माहिती मागवली तर ती दिली जाणार आहे. मुंबईत कॉग्रेसकडून 40 ते 45 वॉर्डच्या पुनर्रचनेची मागणी केली आहे. काँग्रेसची ही मागणी पूर्ण केली जातेय का हे बघावं लागणार आहे.

सीमा तपासल्या जाणार

मुंबईत सर्व वॉर्डांच्या सीमा तपासल्या जातील हे आधीच निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. तसं काम आता पालिकेकडून सुरू करण्यात आलं आहे. भाजपने बदल केलेल्या वॉर्डांची पुनर्रचना करावी ही काँग्रेसची पहिल्यापासूनची मागणी आहे. भाजपने स्वतःसाठी हा बदल केला होता, असा आरोप काँग्रेसने केला होता. त्यामुळे प्रभाग रचनेचा निर्णय झाल्यानंतर 45 वॉर्डची फेररचना केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते रवी राजा यांनी केली आहे.

भाजपचा निर्धार

दुसरीकडे शिवसेनेशी काडीमोड घेतल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपने शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता उलथवून टाकण्यासाठी मिशन मुंबई हाती घेतलं आहे. मुंबई मनपावर भाजपचा भगवा फडकवण्याचा निर्धार विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शिवसेनेच्या नाकावर टिच्चून महानगरपालिकेची आगामी निवडणूक जिंकायचीच, असा चंग यंदा भाजपने बांधला आहे.

मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल

शिवसेना – 97
भाजप – 83
काँग्रेस – 29
राष्ट्रवादी – 8
समाजवादी पक्ष – 6
मनसे – 1
एमआयएम – 1
अभासे – 1 (Bhai Jagtap says party to go solo in BMC elections)

 

संबंधित बातम्या:

BMC Election 2021 | मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकलणार? निवडणूक आयोगासोबत बैठक

मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे ‘एकला चलो रे’

आघाडीऐवजी मैत्रीपूर्ण लढत, BMC निवडणुकांसाठी शिवसेना-काँग्रेसचा नवा फंडा?

(Bhai Jagtap says party to go solo in BMC elections)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI