AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीच्या आमदाराविरुद्ध 8 हजार पानांचं आरोपपत्र, शिवाजीराव भोसले बँक घोटाळाप्रकरणात कारवाई

पुणे पोलिसांनी तपास करून काल शिवाजीनगर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. आरोपींनी नियोजनबद्ध कट करून कर्जदार आणि गुंतवणूकदारांची 496 कोटी 44 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या आमदाराविरुद्ध 8 हजार पानांचं आरोपपत्र, शिवाजीराव भोसले बँक घोटाळाप्रकरणात कारवाई
Anil Bhosale
| Edited By: | Updated on: Sep 16, 2021 | 11:21 AM
Share

पुणे : पुण्यातील राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले (NCP MLC Anil Bhosale) यांच्यासह सात जणांवर दोषारोप दाखल करण्यात आलं आहे. शिवाजीराव भोसले बँकेच्या (Shivajirao Bhosale Bank) 496 कोटी 44 लाख रुपये गैरव्यवहार प्रकरणात 8 हजार पानांचं दोषारोपपत्र दाखल झालं आहे.

पुणे पोलिसांनी तपास करून काल शिवाजीनगर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. आरोपींनी नियोजनबद्ध कट करून कर्जदार आणि गुंतवणूकदारांची 496 कोटी 44 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

या गैरव्यवहार प्रकरणात अनिल भोसलेंसह 7 जण अटकेत आहेत. सायबर क्राईम आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी ही माहिती दिली.

काय आहे प्रकरण?

अनिल भोसले, त्यांची नगरसेविका पत्नी रश्मी भोसले यांच्यासह 16 जणांवर शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बँकेत 71 कोटी 78 लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ऑडिटर योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात फिर्याद दिली होती.

300 कोटींपर्यंत घोटाळ्याची व्याप्ती

बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी खऱ्या दाखवून हा घोटाळा केल्याचा आरोप आहे. एकूण 300 कोटींपर्यंत घोटाळ्याची व्याप्ती असल्याचा दावा केला जात आहे. उर्वरित 222 कोटींच्या घोटाळ्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. काही महिन्यांपूर्वी बँकेवर प्रसाशक नेमण्यात आला होता. त्यानंतर बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले होते. (NCP MLC Anil Bhosale ED arrest Shivaji Bhosle Co-operative Bank Pune Fraud Case)

उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत भोसले यांच्याबरोबरच तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे. सुभाष देशमुख हे भोसले यांचे नातेवाईक असून त्यांनीच कारवाईला अडथळा केल्याचा आरोप याचिकेत केला आहे.

काकडे-भोसले व्याही

धनंजय मुंडे यांच्या फ्लॅटवर शिवाजीराव( भोसले बँकेचे कर्ज आहे. धनंजय मुंडे यांनी 1 कोटी 43 लाख रुपये थकवल्याचं बँकेचं म्हणणं आहे. संजय काकडे हे राज्यसभेवरील भाजपचे खासदार आहेत. काकडे आणि भोसले एकमेकांचे व्याही आहेत. काकडेंचे दुसरे व्याहीसुद्धा राजकीय क्षेत्रातील आहेत. संजय काकडे यांची कन्या कोमल माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची सून आहे. काकडे-देशमुख कुटुंबाच्या शाही विवाहसोहळ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

संबंधित बातम्या : 

शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार, राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंना अटक

300 कोटींच्या बँक घोटाळ्याचा आरोप, राष्ट्रवादीच्या आमदारासह 16 जणांवर गुन्हा दाखल

येरवडा तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदाराला ईडीची अटक

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.