AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळण्याला 100 टक्के केंद्र सरकार जबाबदार, भुजबळांचा घणाघात

शेतकऱ्यांचं हे आंदोलन राजकीय आंदोलन नाही. सर्व मार्केट कमिटींनी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बंद पुकारला असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळण्याला 100 टक्के केंद्र सरकार जबाबदार, भुजबळांचा घणाघात
Chhagan Bhujbal
| Edited By: | Updated on: Dec 08, 2020 | 2:11 PM
Share

जळगाव : केंद्राच्या नव्या कृषी कायद्यावरून देशभरात शेतकरी पेटून उठले आहेत. आज याचा उद्रेक होत भारत बंदंची हाक देण्यात आली. पण शेतकऱ्यांचं हे आंदोलन राजकीय आंदोलन नाही. सर्व मार्केट कमिटींनी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बंद पुकारला असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांकडून होणारे शरद पवार यांचे आरोपही खोडून काढले आहेत. (chhagan bhujbal and vijay wadettiwar criticizes on bjp government regarding farmers protest)

विरोधक हे पवार साहेबांच्या पत्राचा उल्लेख करतात. पण पवार साहेबांनी पत्राद्वारे काही सूचना केल्या होत्या. पीएमसी यात काही सुधारणा करता येईल असं साधं पत्र लिहून त्यांनी सूचना केल्या होत्या. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत हे सगळं खरेदी केलं पाहिजे. दंडुका घेऊन काय बदल करावा अस पवार साहेबांनी सांगितलं नव्हतं. कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकार केंद्राने घेतले राज्य सरकारने याबरोबर काही संबंध राहणार नाही. व्यापारी दलाल यावर कोणाचा नियंत्रण राहणार नाही. हमी भाव शेतकऱ्यावा मिळाला पाहिजे असंही यावेळी भुजबळांनी म्हटलं.

इतकंच नाही तर कृषी कायदा म्हणजे रोगापेक्षा इलाज जालीम असा आहे असंही भुजबळ म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळत आहे. त्याला शंभर टक्के केंद्र सरकार जबाबदार आहे अशी टीका भुजबळांनी केली आहे.

खरंतर, शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज भारत बंद करण्यात आला. याला राज्यातून अनेक राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. केंद्राच्या या आडमुठीपणामुळे आघाडी सरकारने भाजप सरकारला धारेवर धरलं आहे. याच मुद्द्यावर राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

‘आम्ही येतो आणि आम्ही येणार असं म्हणणार्‍यांचे दिवस संपले आहेत. आता परत कधी येणार नाही असं त्यांनी म्हणावं अशा शब्दात विजय वड्डेटीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. दरम्यान, विधानपरिषदेत महाविकास आघाडीचे पूर्ण बहुमत आहे, यांना आता संधी नाही असंही वड्डेटीवार म्हणाले. (chhagan bhujbal and vijay wadettiwar criticizes on bjp government regarding farmers protest)

इतर बातम्या –

Bharat Bandh | पुणे-नाशिक महामार्गावर भारत बंदचा कोणताच परिणाम नाही

Bharat Bandh | भारत बंदमध्ये रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीही सहभागी

(chhagan bhujbal and vijay wadettiwar criticizes on bjp government regarding farmers protest)

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.