AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, नादी लागू नका; छगन भुजबळ यांचं प्रत्युत्तर की…?

सकाळपासूनंच ओबीसी बंधव मेळाव्याला यायला सुरुवात झाली आहे. शहरात सर्वत्र ओबीसींचा एल्गार महामेळाव्याचे होर्डिंग्ज लागले आहेत. स्वराज्य संघटनेने एल्गार परिषद उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पोलीस अलर्ट झाले आहेत. पोलिसांनी हिंगोलीत मोठा बंदोबस्त ठेवला आहे. सभेच्या ठिकाणी सर्वाधिक बंदोबस्त ठेवला आहे. संशियतांवर पोलीस नजर ठेवून आहेत. ओबीसींच्या एल्गार महामेळाव्यावर पावसाचं सावट आहे. ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, नादी लागू नका; छगन भुजबळ यांचं प्रत्युत्तर की...?
chhagan bhujbalImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 26, 2023 | 1:18 PM
Share

स्वप्नील उमप, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, हिंगोली | 26 नोव्हेंबर 2023 : वंचितचे नेते, माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी नेत्यांना माझ्या नादी लागू नका, असा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांनी या ओबीसी नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. प्रकाश आंबेडकर यांच्या या इशाऱ्यानंतर आता ओबीसी नेत्यांमधून प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही आंबेडकर यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांनी अत्यंत सावधपणे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हिंगोलीत आज ओबीसी एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी छगन भुजबळ निघाले होते. यावेळी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे काँग्रेसचे नेते स्वर्गीय राजीव सातव यांच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी राजू सातव यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधला.

मी प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात बोललो नाही. एकही शब्द उच्चारला नाही. या अडचणीच्या काळात आम्हाला प्रकाश आंबेडकर यांचं सहकार्य हवं आहे. तुम्ही मंडल आयोगासह अनेक मुद्द्यावर खूप मेहनत घेतली आहे. आता तुम्ही आम्हाला सहकार्य करावं. मला खात्री आहे एक दिवस तुम्ही आमच्यासोबत याल, असं छगन भुजबळ म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आणि ओबीसींचं ताट वेगळं आहे असं सांगितलं. त्यामुळे आम्ही योग्य मार्गावर असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

दोन चार लोक होते

छगन भुजबळ हे हिंगोलीकडे जात असताना तीन ठिकाणी त्यांचा ताफा अडवण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. दोन तीन ठिकाणी ठिकाणी दोन चार पाच लोक होते. कुठेही माझा ताफा अडला नाही आणि थांबला नाही, असं सांगतानाच या देशात प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. मी सभेसाठी जाणार आहे, असं भुजबळ म्हणाले.

भुजबळ मुख्यमंत्री झाले तर चांगलं

छगन भुजबळ यांचा ताफा अडवण्यात आला आहे. त्यावर रासप नेते महादेव जानकर यांनी भाष्य केलं आहे. लोकशाही मार्गानं सगळ्यांनी जायला पाहिजे. काळे झेंडे दाखवून काहीही होणार नाही. ओबीसीचं आंदोलन देखील शांतेतं चालावं. कुणीही कुणाला रोखण्याचा प्रयत्न करू नये. भुजबळ साहेब मुख्यमंत्री झाले तर चांगलं आहे. विजय वडेट्टीवारांना काँग्रेसने मुख्यमंत्री केलं तरी चांगलं आहे. तसेच भाजपने पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री केलं तरी चालेल, असं महादेव जानकर म्हणाले.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.