युतीच्या चर्चांना वेग, मुख्यमंत्री थेट 'मातोश्री'वर

मुंबई : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपकडून सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली आहे, तर दुसरीकडे शिवसेना-भाजपमध्ये मात्र अजूनही युती संदर्भात अंतिम निर्णय समोर आलेला नाही. मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या …

Daily Updates, युतीच्या चर्चांना वेग, मुख्यमंत्री थेट ‘मातोश्री’वर

मुंबई : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपकडून सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली आहे, तर दुसरीकडे शिवसेना-भाजपमध्ये मात्र अजूनही युती संदर्भात अंतिम निर्णय समोर आलेला नाही. मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत युतीसाठी सकारात्मक चर्चा झाल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे जास्त चर्चा करु शकलो नाही असं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्येत ठिक नसल्याने आज औरंगाबादचा दौरा रद्द करत थेट मुंबई गाठली. मात्र मुंबईत येताच मुख्यमंत्र्यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या बैठकीत युतीसाठी सकारात्मक चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच शिवसेना शेतकऱ्यांच्या , गरीबांसाठीच्या प्रश्नासाठी आणि काही योजनांसाठी आग्रही आहे. त्याबद्दलही आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

जागा वाटपाच्या वाटाघाटीत दोन्ही पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये अजून युती संदर्भात ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे दिवस आणि वेळही वाय जात आहे. यासाठी शिवसेने भाजपला दोन दिवसांची मुदत दिली होती. तर आज शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान तुमचा तर मुख्यमंत्री आमचा असे सांगत मुख्यमंत्री पदाची मागणी केली होती. मात्र आजच्या झालेल्या बैठकीमुळे युतीमधील वाद मिटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

व्हिडीओ : पाहा, मुख्यमंत्री काय म्हणाले?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *