माझ्या नातवाचा जन्म झाला अन् तुमचं अध:पतन सुरू झालं; एकनाथ शिंदे असं का म्हणाले?

तुम्ही मुख्यमंत्री झाले. तुमचा मुलगा मंत्री झाला. आम्ही काही बोललो. लाज तुम्हाला वाटायला हवी होती. बाळासाहेबांच्या विचारांना तोडून मोडून तुम्ही सत्ता मिळवली.

माझ्या नातवाचा जन्म झाला अन् तुमचं अध:पतन सुरू झालं; एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Image Credit source: TV9 Network
वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Oct 05, 2022 | 10:42 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे दसरा मेळावा (Dussehra Melava) पार पडला. या मेळाव्यात नातवावरुन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackarey) चांगलाच समाचार घेतला आहे. माझा नातू बच्चू दीड वर्षाचा आहे रुद्रांश. त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अध:पतन सुरू झालं. कुणावर टीका करताय त्या दीड वर्षाच्या बाळावर.काय बोलायचं किती बोलायचं किती लेव्हलवर जायचं. पायाखालची वाळू सरकली ना, अशा शब्दात शिंदेनी ठाकरेंवर निशाणा साधला.

तुम्ही मुख्यमंत्री झाले. तुमचा मुलगा मंत्री झाला. आम्ही काही बोललो. लाज तुम्हाला वाटायला हवी होती. बाळासाहेबांच्या विचारांना तोडून मोडून तुम्ही सत्ता मिळवली. छातीवर दगड ठेवून मी तुमच्यासोबत राहिलो. मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे होती.

बाळासाहेब असते तर हा मुख्यमंत्री झाला नसता हे राणेंनी सांगितलं. मी पुढचं काही बोलणार नाही. हा अधिकार राणे साहेंबांना आहे.

नवी मुंबईच्या विमानतळाचं नाव तुम्हीच सांगतिलं

आपण प्रकल्प सुरू केले. नवी मुंबईच्या विमानतळाचं नाव तुम्हीच मला सांगितलं. बाळासाहेबांच्या नावाचं पत्रं द्या म्हणून. मला अभिमान वाटला. बाळासाहेबांचं नाव दिलं त्याचं अभिमान वाटलं. मी समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव दिलं. अभिमान आहे.

विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव द्यायचं होतं. तुम्ही बैठकीतून दोन तीन वेळा उठून गेला. हे सर्वांना माहीत आहे. मी परवा दि बा पाटलांच्या मुलाला भेटलो. तुम्ही त्यांना सांगितलं, हे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं. अरे असं का करता. एवढा खोटारडेपणा. बाळासाहेब जे बोलायचे ते बोलायचे. एकदा बोलल्यावर माघार घेत नव्हते. पण तुमचा खोटारडेपणा त्यांना कळलं आहे.

मराठा समाजाच्या मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हटलं

एकनाथ शिंदेंना वाईट बोललं पाहिजे म्हणून तुम्ही केलं. पण तो समाज सूज्ञ आहे. तुम्ही अल्पमतात असताना ठराव केला. आम्ही पूर्ण मतात असताना निर्णय घेतला. तुम्ही कोणत्या समाजासोबत राहिला. मराठा समाजाच्या मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हटलं.

मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. मला कटप्पा म्हणाले. पण कटप्पा स्वाभिमानी होता, प्रामाणिक होता. तुमच्यासारखा दुटप्पी राजकारणी नव्हता. कोणत्याही शिवसैनिकाला त्रास दिला नाही. असं बोगस काम करणारे नाही. आम्ही समोरून वार करणारे. तुमच्यासारखं पाठीत खंजीर खुपसणारे नाही.

आम्हाला कुणावरही अन्याय करायचा नाही. अन्याय करून कुणालाही आमच्या पक्षात घ्यायचं नाही. कोणी चूक केली आणि कोण बरोबर आहे. असले धंदे तुम्ही केले, आम्ही नाही.

कोथळा काढण्यापेक्षा पोटाची खळगी भरायला शिका

इमोशनल ब्लॅकमेलिंग चालणार नाही. हे इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे. कोथळा काढण्यापेक्षा पोटाची खळगी भरायला शिका. कोथळा जाऊ दे, तुम्ही कुणाला एक चापट तरी मारलीय का. बोलायचा अधिकार या लोकांना आहे, त्यांच्यावर शंभर शंभर केसेस आहेत.

प्रत्येक केसमध्ये मी एक नंबर आरोपी होतो. तुमच्यावर किती केसेस आहेत. ज्यांच्यावर केस आहे, त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. त्यांना गद्दार म्हणता, कुठे फेडाल हे पाप, अशा शब्दात शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना खडेबोल सुनावले आहेत.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें